corona test esakal
जळगाव

Corona चाचण्या झाल्या कमी; बाधितांच्या संख्येतही घट

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घट होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घट होत आहे. आता बाधितांच्या समवेत वीस जणांची कोरोना चाचणी करणे बंद झाले असून केवळ बाधित व त्याच्या कुटुंबातील व्यक्तींचीच कोरोना (Corona) चाचणी होत आहे. दररोज दहा ते शंभर बाधितांसह संपर्कातील व्यक्तीची कोरोना चाचणी केली जात आहे. रुग्णालयात दाखल होण्यासारखी गंभीर रुग्ण कोरोनाचे नसल्याने त्यांना घरीच राहून उपचार घेण्याचा सल्ला दिला जात आहे. (Latest Marathi News)

कोरोना महामारीच्या आतापर्यंत तीन लाटा येऊन गेल्या आहेत. तरीही महामारी अजून पाठ सोडायला तयार नाही. चौथी लाट जूनमध्ये येणार असे संकेत आरोग्य विभागाने दिले होते. मात्र, तशी लाट आलेली नाही. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याने तिसरी लाट आली तरी रुग्णांना थेट रुग्णालयात दाखल करून ऑक्सिजनवर ठेवण्याची गरज पडली नाही. प्रतिबंधक लस घेतल्याने रुग्ण संख्या वाढलेली नाही. नागरिकांनी मास्क वापरावा, गर्दीत जाणे टाळावे, वारंवार हात धुवावेत असा सल्ला आरोग्य विभागाचे अधिकारी देताना दिसतात.

कोरोनाबाधितांचा तपशील

रविवारचे बाधित रुग्ण --१३

जळगाव शहरात आढळलेले--६

होम आयसोलेशनमध्ये असलेले--६३

रविवारी बरे झालेले रुग्ण--७

आतापर्यंतचे एकूण बाधित--१५१८६६

आतापर्यंत एकूण बरे झालेले--१४९२०४

एकूण मृत्यू--२५९२

''जी व्यक्ती बाधित आढळतेय अशांच्याच कुटुंबातील व्यक्तीची कोरोना चाचणी होत आहे. पुणे, मुंबईप्रमाणे जळगावमध्ये बाधितांची संख्या हळूहळू वाढत आहे. चौथ्या लाटेची शक्यता कमी आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करणे गरजेचे आहे.'' - डॉ. किशोर इंगोले, प्रयोगशाळा प्रमुख, जीएमसी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील; निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

SCROLL FOR NEXT