Newly married couple.  esakal
जळगाव

Unique Wedding : मुलगी बघायला आले आणि लग्न लावून गेले...!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मुलगी पाहण्यासाठी आलेल्यांना मुलगी पसंत पडल्यानंतर तत्काळ लग्न करण्याची बोलणी केली व त्याला मुलीकडील मंडळींकडून होकार मिळताच, लग्न लावण्याचा सर्वानुमते निर्णय घेऊन लगेचच लग्न लावण्यात आले. (couple got married in first meeting with family jalgaon news)

मुस्लिम समाजातील हा आदर्श विवाह ठरला आहे. येथील शेरा चौक व सहारा हॉस्पिटलमागील रहिवासी फिरोज इसाक पटेल यांची मुलगी सानिया हिला पाहण्यासाठी नाचणखेडा (ता. जामनेर) येथील मुनीर रसीद पटेल यांचा मुलगा मोहसीन मुनीर पटेल आले होते.

मुला-मुलीची पसंती झाल्यानंतर दोन्हीकडील मंडळींमध्ये लग्नाबाबत चर्चा सुरू झाली. मुलगा व मुलींच्या नातेवाइकांनी वाढती महागाई पाहता, जुन्या रुढी परंपरांना फाटा देत याचवेळी लग्न लावण्याचे ठरविले. यासाठी दोन्हीकडील मंडळींनी समंती दिल्यानंतर मुस्लिम समाजातील काजींना बोलावून निकाह लावण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या वेळी मोहंमद बाबा पटेल, जीवन इसाक पटेल, रफीक इसाक पटेल, रज्जाक युसूफ पटेल, अब्बास बशीर पटेल, भाईसाहेब बशीर महेमूद, छोटू पटेल, जहांगीर पटेल, मुनीर पटेल, अमन मुराद पटेल आदी उपस्थित होते.

नववधू खडकी बुद्रूक (ता. चाळीसगाव) येथील माजी उपसरपंच तथा पत्रकार मुराद पटेल यांची भाची आहे. मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात विवाह लावण्यात आल्याने दोन्हीकडील मंडळींचे समाजातून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT