kirankumar Bakale Controversy Case esakal
जळगाव

Kirankumar Bakale : बकालेंचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला

सकाळ वृत्तसेवा

Kirankumar Bakale : स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुन्हा फेटाळला आहे. बकालेंनी उच्च न्यायालयात फिर्याद रद्दसाठी दाखल केलेल्या अर्जावर ३० ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

बकालेंच्या अटकेसाठी आता सकल मराठा समाज एकत्रित होणार असून, त्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समाजाने दिला आहे. (court rejected Bakale pre arrest bail session jalgaon news)

मराठा समाजाबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याप्रकरणी बकालेंवर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी बकाले यांनी अटकपूर्व जामीनअर्ज सत्र न्यायालय जळगाव तथा उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल केला होता. तो नामंजूर झालेला आहे.

फिर्याद रद्द अर्जावर ३० तारखेस सुनावणी

बकाले यांनी उच्च नायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात फौजदारी अर्ज क्र. २४०७/२०२३ या गुन्ह्यातील फिर्याद रद्द करण्यासाठी दाखल केला आहे.

दोन न्यायमूतींच्या पीठाने बकाले यांनी तपास अधिकाऱ्यांना समक्ष हजर होऊन सहकार्य करावे, असे निर्देश दिले होते. त्यावर ४ ऑक्टोबरला सुनावणी होणार होती. मात्र, ती होऊ शकली नाही. त्यासंबंधी कामकाज आता ३० ऑक्टोबरला होणार आहे.

अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी बकालेंच्या वतीने पुन्हा सत्र न्यायालयात २१ ऑक्टोबरला अर्ज दाखल केला. त्यावर बुधवारी महिलांच्या वतीने हरकत दाखल करण्यासाठी मुदत मिळावी म्हणून अॕड. गोपाळ जळमकर व कुणाल पवार यांचे वकीलपत्र दाखल करण्यात आले.

सत्र न्यायाधीश बी. एस. वावरे यांनी ३१ तारखेपर्यंत हरकत दाखल करणेसाठी मुदत दिली आहे. बकालेंच्या वकिलांनी तात्पुरता जामीन मंजूर करावा यासाठी विनंती केली. परंतु सत्र न्यायालयाने ती अमान्य केली व पुढील सुनावणी ३१ ऑक्टोबरला ठेवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ''तुम्ही बंजारा समाजासारखे दिसत नसतानाही आरक्षण का खाल्लं?'', धनंजय मुंडेंना उद्देशून जरांगेंचं मोठं विधान

अडीच वर्षांपूर्वी विवाह, पतीसह सासरच्यांकडून छळ; पोलिसाच्या पत्नीनं तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन, दिरानं रुग्णालयात नेलं, पण...

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

Crop Loss: पिकेच झाली उद्‍ध्वस्त, खत देणार कशाला? नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ७० हजार टनांहून अधिक साठा पडून

Layoff 2025: अमेरिकन कंपनीचा धक्कादायक निर्णय; 4 मिनिटांच्या कॉलमध्येच भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं

SCROLL FOR NEXT