Nasal Vaccine of Covid 19 Sakal
जळगाव

Jalgaon Covid Vaccination Campaign : जळगावात पुन्हा कोविड लसीकरणाचे अभियान

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : गेल्या काही दिवसांपासून थंडावलेले कोविड लसीकरण अभियान जळगावात पुन्हा सुरू होतेय. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना नाकाद्वारे घ्यावयाची इनकोव्हॅक लस उपलब्ध झाली आहे. (Covid vaccination campaign again starting in Jalgaon news)

मार्च २०२० पासून भारतासह जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनावर भारताने प्रतिबंधक लस शोधून त्यासंबंधी लसीकरण अभियानही प्रभावीपणे राबविले. मात्र, वर्षभरापासून कोरोनाची तीव्रता कमी झाल्यामुळे लसीकरणही थंडावले होते. आता हे अभियान नव्याने सुरू होत आहे. त्यासाठी जळगाव महापालिकेकडे नाकाद्वारे घ्यायची इनकोव्हॅक लस उपलब्ध झाली आहे.

ही लस महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शाहूनगर, शिवाजीनगरातील डी. बी. जैन दवाखना, शनिपेठेतील भागवत खंडू सोनवणे प्राथमिक विद्यालय, पंचमुखी हनुमान मंदिरामागील नानीबाई अग्रवाल हॉस्पिटल व सिंधी कॉलनीतील चेतनदास मेहता रुग्णालय, मास्टर कॉलनीतील मुलतानी दवाखाना व पिंप्राळ्यातील सुरेशदादा जैन विद्यालयात उपलब्ध आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

असे आहेत निकष

ही लस केवळ ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मिळेल. ज्यांनी यापूर्वी कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेतले आहे, त्यांनाच ही लस मिळेल. बूस्टर डोस दुसऱ्या डोसच्या सहा महिन्यांनंतर घ्यावा. लस घ्यायला येताना नाश्‍ता किंवा जेवण करून यावे. उपाशी पोटी लस घेऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHP Garba Ban : गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांचा विरोध; संविधानाचा दिला दाखला

'बोक्या सातबंडे' चित्रपटात पेपर विकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? आज मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवतोय, कोण आहे हा?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

SCROLL FOR NEXT