Jalgaon Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : विवाहितेस बेदम मारहाण केल्याप्रकरणी पतीविरूद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : तांबेपुरा भागातील एका विवाहितेचा छळ करून पतीने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता. ३) दुपारी घडली.

यात ती विवाहिता गंभीर जखमी झाली आहे. (Crime against husband for brutally beating wife jalgaon crime)

याप्रकरणी विाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरूद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महिला समुपदेशन केंद्र आणि महिला संरक्षण अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने त्या महिलेचे प्राण वाचले.

महिलेले दिलेल्या फिर्यादीनुसार, तांबेपुरा भागातील हनुमान मंदिराजवळ अजय राजपूत हा पत्नी नेहा राजपूत हिच्यासह राहतो. मात्र, आई-वडिलांशी कौटुंबिक भांडणाच्या कलहामुळे दारू पिऊन नेहमीच पत्नीला मारहाण करतो. तसेच नेहाचे सासरे पंडित राजपूत व जेठ विजय राजपूत हे भांडण मिटविण्यासाठी येतात.

तेव्हाही अजय राजपूत हा पत्नीवर त्यांच्याविषयी संशय घेत मारहाण करतो. २ मेस रात्री अकराला अजय राजपूत हा दारू पिऊन घरी आला व मी आईकडे जशी हिस्सा वाटणी मागत आहे, तशी तू देखील माग, असे पत्नीला सांगू लागला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र, पत्नीने यास नकार दिला. याचा त्यास राग आल्याने त्याने पत्नीला लाकडी दांडा, लाथा, बुक्क्यांनी जबर मारहाण केली. रात्रभर नेहा तशाच पडून होत्या.

३ मेस सकाळी दहाला अजय राजपूतने पत्नीला ‘तू माझ्या घरात राहू नको, असे म्हणत शिवीगाळ केली. या घटनेबाबत तिचे सासरे व तिच्या आईवडिलांनाही निरोप मिळाला.

त्यांची आई शोभाबाई राजपूत व भाऊ गोपाल राजपूत यांनी लागलीच महिला समुपदेशन केंद्र व महिला संरक्षण अधिकारी यांना कळविल्याने योगिता सुभाष चौधरी, रेणुका प्रसाद, ज्ञानेश्‍वरी चंद्रकांत पाटील हे नेहा यांच्या घरी गेले आणि खासगी वाहनाने आणत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावरून पत्नी नेहा हिने दिलेल्या जबाबानुसार, पती अजय पंडीत राजपूत यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT