Crime News esakal
जळगाव

Crime News : फाईल्ससह रक्ताने माखलेला चाकु भोईटेंच्या घरात केला प्लांट

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : गंभीर गुन्ह्यात अडकवण्यासाठी विजय पाटील व किरणकुमार साळुंखे यांनी भोईटेंच्या घरात रक्ताने माखलेला चाकू आणि काही फायली प्लांट केल्याची तक्रार नीलेश भोईटे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी विजय पाटील, किरण साळुंखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

जळगाव जिल्‍हा विद्याप्रसारक संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी नीलेश भोईटे आणि ॲड. विजय पाटील गटामध्ये काही वर्षापासून वाद सुरू आहेत. वाद विकोपाला जाऊन परस्पर विरुद्ध गुन्ह्याचे सत्र सुरूच असून, काल रात्री उशिरा भोईटे यांनी शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली.(Crime Case Many Crime Related Samples observed in Bhoite house Jalgaon News)

भोईटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्याविरुद्ध निंभोरा पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा पुणे येथे वर्ग केला आहे. दाखल गुन्ह्यात कोथरूड पोलिसांनी भोईंटेच्या जळगावच्या घरी कोणीही नसताना (ता. ९ जानेवारी २०२२) छापा टाकला होता.

या कारवाईत पोलिसांनी तपासणी केल्यानंतर विजय पाटील व किरणकुमार साळुंखे असे दोघे त्यांच्या स्विफ्ट डिझायरने (एमएच-२०-बीएन-०९०) रात्री सव्वादहा ते साडेदहाच्या सुमारास त्यांच्या इतर साथीदारांसोबत आले. त्यांनी बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केला.

घरात प्रवेश केल्यानंतर सोबत आणलेल्या पिशवीत काही फायली व रक्ताने माखलेला चाकू घरात ठेवला. यामागे मला गंभीर गुन्ह्यात अडकवण्याचा कट आहे. या सर्व बाबींचे सीसीटीव्ही फुटेज व रेकॉर्डिंग असल्याचे भोईटे यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी शहर पोलिसांत विजय पाटील, किरणकुमार साळुंखे व साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Police Encounter : सिग्मा टोळीचा म्होरक्या रंजन पाठकसह चार कुख्यात गुन्हेगारांचा एन्काउंटर; पोलीसांची मोठी कारवाई

NCERT AI Training: आनंदाची बातमी! आता NCERTकडून शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार 5 दिवसांची एआय ट्रेनिंग, अशा प्रकारे करा नोंदणी

Dabeli Sandwich Recipe: भाऊबीजनिमित्त लाडक्या भावासाठी सकाळी नाश्त्यात बनवा दाबेली सँडविच, सोपी आहे रेसिपी

Neeraj Chopra : गोल्डन बॉयची नवी ओळख..! ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा यांना टेरिटोरियल आर्मीमध्ये 'लेफ्टनंट कर्नल' हा सन्मान प्रदान

Shubman Gill : पाकड्यांचे किडे वळवळले...! शुभमन गिलसोबत हात मिळवला अन् नंतर 'पाकिस्तान जिंदाबाद'चा नारा दिला, कॅप्टनने काय केले ते पाहा? Video

SCROLL FOR NEXT