जळगाव : रविवारी (ता. ३०) महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त ‘ड्राय डे’ला शहरात सर्रास दारूची विक्री झाली. एमआयडीसी पोलिसांनी कुसुंब्यासह साईनगरात दोन वेगवेगळ्या भागांत कारवाई केली. सिद्धेश्वर डापकर यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दाखल केली. सोमवारी (ता. ३१) त्यांच्यासह उपनिरीक्षक अनिस शेख, गफार तडवी, शांताराम पाटील, अलका माळी यांना प्रताप शिकारे यांनी दिलेल्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.
सुरेशदादानगर झोपडपट्टी भागात कुसुंबा गावी आशा सोनवणे घराच्या आडोशाला बेकायदा हातभट्टीची दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दुपारी एकला पोलिसांनी छापा टाकून हवालदार अलका माळी यांनी पकडल्यावर चौकशी केल्यांनतर आशा सोनवणे (वय ३२, रा. सुरेशदादानगर कुसुंबा) हिच्या ताब्यातून प्लॅस्टिक कॅन व एक हजार २५० रुपयांची ३५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त करण्यात आली. तपासणीसाठी नमुना वेगळा काढून उर्वरित दारू पंचासमक्ष जागीच नष्ट केली. आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपीविरोधात मुंबई पोलिस अधिनीयम कलम- ६५ (ई), प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
साईनगरात बेकायदा दारू जप्त
पोलिस अश्विनी इंगळे यांच्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, अतुल वंजारी, सुधीर सावळे, सतीश गर्जे, गोविंदा पाटील, शांताराम पाटील, मीनाक्षी घंटे यांना पोलिस निरीक्षक शिकारे यांनी दिलेल्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. साईनगर, व्ही सेक्टर, एमआयडीसी येथे सरलाबाई पाटील ही संतोष पाटील याच्याकरवी बेकायदा देशी टॅगो पंच दारूची चोरटी विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दुपारी दोनला छापा टाकण्यात आला. पोलिसांनी संतोष पाटील याच्या ताब्यातून ९६० रुपयांच्या १८० एम. एल. मापाच्या देशी टँगो पंच कंपनीच्या सीलबंद १६ बाटल्या जप्त केल्या. या आरोपीविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.