Crime News  esakal
जळगाव

Crime News : हमालाची कमाल! टोळी उभारुन आखायचा मोठ्या गुन्ह्यांचे प्लॅानिंग

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : उचंदा (ता. मुक्ताईनगर) येथील सराफावर हल्ला करून लुटले होते. दरोडेखोरांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह १७ लाख ८० हजारांचा ऐवज लांबविला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग तीन दिवस पाळत ठेवून सहा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या असून, टोळीचा म्होरक्या सुनील जाधव याच्याकडून १२ लाख ८० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

उचंदा येथील नीलेश वसंत सोनार (वय ३२, रा. नरवेल, ता. मुक्ताईनगर) सराफ दुकानातील दागिने आणि पैसे घेऊन घराकडे निघाले. नरवेल फाट्याजवळ काळ्या रंगाच्या दुचाकीवर तोंडाला रुमाल बांधून अलेल्या तिघांनी धारदार शस्त्र लावून नीलेश सोनार यांच्या हाता-पायावर चाकूने वार करून ९ लाखांचे सोने, ८० हजारांची २ किलोचे चांदी, ८० हजारांची रोकड, असा एकूण १० लाख ६० हजारांचा ऐवज लूटून नेला होता.

अप्पर पोलि अधीक्षक चंद्रकांत गवळी, निरीक्षक किसनराव नजनपाटील पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ ते दुकानापर्यंतच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज संकलीत केले व सलग तीन दिवस वेगवेगळ्या पाच पथकांनी माहिती संकलीत केली. सीसीटीव्ही फुटेजच्या अधारावर दरोड्यातील टोळीचा छडा लावला.

सहा साथीदारांची टोळी
सुनील मिश्रीलाल जाधव (वय २३, मुळ रा. अंजाळे चिंचखेडा, ता. धुळे, ह.मु. सुप्रीम कॅालनी), प्रकाश वसंत चव्हाण (३०, रा. भिकनगाव खरगोन, ह.मु. सुप्रीम कॉलनी), आकाश दिलीप पवार (२४, रा. लेाणवाणी, ह.मु. सुप्रीम कॉलनी) या तिघांच्या चौकशीत विशाल देविदास मराठे (२३, रायपूर कंडारी), विनोद विश्वनाथ इंगळे (२५, उचंदा ता. मुक्ताईनगर) आणि पाचोऱ्याच्या गुन्ह्यात सहभागी विशाल विजयसिंग बागडे (वय ३०, रा. कंजरवाडा, जळगाव) अशा सहा संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

‘हमाल’ डोक्याची गुन्ह्यांत ‘कमाल’
दरोडेखोरांच्या टोळीचा म्होरक्या सुनील जाधव नावाला साधे हमालीची कामे करतो. मात्र, प्रत्येक वेळेस साथीदार बदलून मोठ्या गुन्ह्यांचे प्लॅनिंग आखत होता. त्यात तो नेहमीच वेगवेगळे साथीदार जुळवून गुन्हे करीत असल्याने पोलिसांना मिळून येत नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedarnath: आता केदारनाथ दर्शन आणखी सोपे होणार! ८ तासांचा प्रवास केवळ ३६ मिनिटांत, नवीन प्रकल्पाला सुरूवात, पाहा व्हिडिओ

Ohh Shit...! पाकिस्तान संघाचा टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का, दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले अन् शुभमनची डोकेदुखी वाढवली

IRCTC Diwali Scam : दिवाळीला घरी जाताय? रेल्वेचं तिकीट बूक करताना 'या' 3 गोष्टी लक्षात ठेवाच, नाहीतर बनावट एजंट तुम्हाला लुटतील

MP Sanjay kaka Patil : नौटंकी करणे माझ्या रक्तात नाही, अजित दादांच्या माजी खासदारांने सरकारला सुनावलं

JioHotstar बंद पडलं! Network Error मुळे संतापले युजर्स, कंपनीने सांगितलं धक्कादायक कारण?

SCROLL FOR NEXT