jalgaon crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : जळगाव शहराची ‘क्राइम कॅपिटल’कडे वाटचाल? किरकोळ वादातून वातावरण तापतेय

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरात खुलेआम गुन्हेगारांच्या दहशतीचे प्रदर्शन सुरू आहे. कुठे बाई माणसाला चाकू मारते, कुठे वाळूमाफियाला भाईगिरीचा नशा चढतो, तर कुठे वाढदिवसांचा धिंगाणा घालण्याचे प्रकार वाढत आहेत.

विशेष म्हणजे हे सर्व प्रकार लगोलग सोशल मीडियावर ‘व्हायरल’ करून त्या माध्यमातून समाजात दहशत माजविण्याची स्पर्धाच गुन्हेगारांमध्ये लागलीय. (crime rates increasing in city jalgaon crime news)

हे सर्व सर्रास सुरू असताना, पोलिस यंत्रणा मात्र हातावर हात धरून केवळ वाहने तपासणीपलीकडे काहीही करताना दिसत नाही. गुन्हेगारांवरील कारवाई तर दूरची गोष्ट. हे चित्र निर्माण कसे होतेय, त्यासाठी अलीकडच्या काळातील काही गंभीर घटनांचा आढावा घेता येईल.

बाईचा पुरुषावर चाकूने वार

जळगाव शहरातील अजिंठा चौकात एक बाई हातात चाकू घेऊन तिच्या सोबतच्या पुरुषावर सपासप वार करते, तो रक्तबंबाळ होऊन हिरोसारखा स्वतःचा खून त्या बाईकडून करवून घेण्यासाठी तिला उद्द्युक्त करतो.

घडला प्रकार प्रचलित सोशल मीडियावर व्हायरल होतो. वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्यावर संबंधितांना एमआयडीसी पोलिस पकडून आणतात. दोघेही पूर्वाश्रमीचे नवरा-बायको असल्याचे निष्पन्न होते. दोघांवर कारवाई होऊन सुटका होते.

‘मन्या आला...’ची दहशत

या घटनेला आठवडा उलटत नाही, तोवर शहरातील दुसऱ्या महत्त्वाच्या चौकात वाळूमाफिया विठ्ठल पाटील जीपच्या बोनटवर बसून गुन्हेगारी स्टाइल स्टंटचा व्हिडिओ तयार करून व्हायरल करतो. ‘भाईचा बर्थ डे’ साजरा करण्यासाठी कधी सुप्रीम कॉलनीत तलवारीने केक कापला जातो, तर कधी गेंदालाल मिलमध्ये केक कापण्यासाठी चॉपरचा वापर होतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सोशल मीडियावर व्हायरल

हे सर्व बेकायदेशीर आणि दहशत निर्माण करणाऱ्या घटनांचे फोटो, व्हिडिओ तयार करून त्यांना चित्रपटातील गाण्यांच्या म्युझिकवर एडिटिंग करून नंतर ते सोशल मीडियावर स्टेट्स म्हणून व्हायरल करण्यात येतात.

असे प्रकार आता सातत्याने घडू लागले असून, व्हायरल व्हिडिओनंतर संबंधितांवर कारवाई होऊन मुक्तता होते. मात्र, ज्या लोकांना आणि समाज घटकाला संदेश पोचवायचा आहे, तो नेमक्या पद्धतीने पोचविला जातो, हे मात्र निश्‍चित.

‘बाप तो बाप रहेंगा..’

वाळू व्यावसायिक विठ्ठल पाटलाचा ‘मन्या आला...’ असा आकाशवाणी चौकातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या घटनेला २४ तास उलटत नाही, तोच तांबापुरातील सट्टा व्यावसायिकाच्या पुत्राच्या वाढदिवसाचा तमाशा समोर आला. या महाशयाने ‘बाप तो, बाप रहेंगा’ या हरियानवी गाण्यावर वाढदिवसाचा केक चॉपरने कापून तो व्हिडिओ स्टे‌ट्स फेसबुक-व्हॉट्‌सॲपद्वारे व्हायरल केला आहे.

तांबापुरात चॉपरने कापला केक

बुधवारी (ता. १७) रात्री तांबापुरा बिस्मिल्ला चौकातील आणखी एक व्हिडओ स्टेट्स व्हॉट्‌सॲप आणि फेसबुकवर व्हायरल करण्यात आला. साहील महमूद शेख याच्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी मुन्ना शहा अजीज शहा याने कंबरेतून चॉपर काढून दिला.

तौफिक कमाल शेख व त्यांची टोळी हजर होती. विषेश म्हणजे तांबापुरातील हा परिसर जातीय संवेदनशील असून, व्हिडिओत दिसणाऱ्यांना यापूर्वी दंगलीच्या गुन्ह्यातही अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

किरकोळ वादातून दोन गटांत दंगल

शहरातील मासूमवाडी परिसरातील डायमंड हॉलजवळ बुधवारी (ता. १७) गल्लीतील काही मुले मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकवटले. त्यात डोक्यावर अंडे फोडण्याच्या नादात समोरच्या गटातील युवकाशी वाद होऊन दोन गटांत दंगल उसळली.

मित्रांनी ‘बर्थ डे बॉय’च्या डोक्यात अंडे फोडण्याचा प्लॅन केला होता. डोक्यात अंडे फोडत असल्याने काही तरुण डायमंड हॉलकडून सम्राट कॉलनीच्या दिशने आरडाओरड करत पळत सुटले. आपल्याकडे दगडफेक होत असल्याने सम्राट कॉलनी आणि आपल्या पोरांना मारताय, म्हणून मासूमवाडी असे दोन्ही गट समोरासमोर आले.

यात काही वाहनांची नासधूस करण्यात आली. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत जिशांत ऊर्फ दिशू युनूस सिकलगर, शाकिब फारुख पटेल, उमर ऊर्फ गोलू जावेद शेख, परवेज ऊर्फ तिरंग खान युनूस खान, रफिक मुसा पटेल, सय्यद आकिब सय्यद वाहेद, अफसर जाकीर शेख, नईम बंडू सिकलगर यांच्यासह इतर १० ते १२ संशयितांवर गुन्हा दाखल करून अटकसत्र राबविले. दगडफेकीत पोलिस कर्मचारी छगन तायडे व किरण पाटील किरकोळ जखमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT