Obstinate offender banished for two years esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अट्टल गुन्हेगार 2 वर्षांसाठी हद्दपार

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार आकाश भास्कर विश्वे यास दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार आकाश भास्कर विश्वे (वय ३४, रा. भगवा चौक सुप्रिम कॉलनी) यास दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. (criminals exiled for two years Jalgaon Crime News)

त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत, प्राणघातक हल्ले अशा स्वरूपाचे तब्बल आठ गुन्हे दाखल असून यापूर्वी (वर्ष-२०१६) मध्ये त्याला एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. हद्दपार करूनही विश्वे याच्या गुन्हे करण्याचा कित्ता सलग सुरुच होता.

परिणामी एमआयडीसी पोलिसांनी हद्दपारी प्रस्ताव तयार करून तो जिल्‍हाधिकारी कार्यालयात रवाना केला हेाता. प्रांताधिकारी महेश सुधाळकर यांच्या समक्ष सुनावणी होवुन संशयित आकाश भास्कर विश्वे यास दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, गणेश शिरसाळे, निलोफर सय्यद, सचिन पाटील, योगेश बारी, साईनाथ मुंडे, नरेंद्र मोरे अशांच्या पथकाने त्यास ताब्यात घेत हद्दपार कालावधी पूर्ण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोडण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fraud News : बेरोजगारांच्या फसवणुकीचे मायाजाल! नोकरीचे आमिष दाखवून तरुण- तरुणींना लाखोंना गंडा

Latest Maharashtra News Updates : आमदार हेमंत पाटील यांच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने केला निषेध

Viral Video: लहानपणीची गोष्ट खरी ठरली! ससा अन् कासवाची लावली स्पर्धा; ससा का हरतो? खरं कारण आलं समोर

Nashik News : सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक

Hadsar Fort: हडसर गडावर सापडला इतिहासाचा अमूल्य ठेवा; गड संवर्धन मोहिमेत मिळाला फारसी शिलालेख

SCROLL FOR NEXT