Water issue esakal
जळगाव

Jalgaon Water News : जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद; 73 विहिरी अधिग्रहित

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यात अद्यापही पाऊस सुरू झालेला नाही. एकीकडे तापमानात वाढ होत आहे, तर दुसरीकडे पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद होत आहे.

टँकरची संख्या आता २९ वर पोहोचली आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. आठवडाभर पाऊस न आल्यास तीव्र पाणीटंचाईचा सामना गावांना करावा लागणार आहे. (crisis of water scarcity is acute in district number of tankers reached Twenty Nine Seventy three wells acquired Jalgaon News)

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४२ अंशावर स्थिरावला आहे. तापमानामुळे विहिरींनी तळ गाठल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे, तर शहरी भागात आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे.

यामुळे नागरिकांचे पाण्याअभावी प्रचंड हाल होत आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

एकूण २६ गावांमध्ये २९ टँकरसद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात शासकीय नऊ आणि खासगी २० टँकरचा समावेश आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या गावांमध्ये झाल्या विहीर अधिग्रहण

जिल्ह्यात जामनेर तालुक्यात २६, भुसावळ १, मुक्ताईनगर ११, बोदवड ४, धरणगाव ३, पारोळा ६, एरंडोल १, पाचोरा ६, चाळीसगाव १, रावेर १, अमळनेर ९, भडगाव २, चोपडा २, असे एकूण ७३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

तालुका- टँकर्सची संख्या

जळगाव--१

जामनेर--६

भुसावळ--२

बोदवड--१

पारोळा--२

पाचोरा--३

चाळीसगाव--९

भडगाव--२

एकूण--२९

"अल निनो’च्या प्रभावामुळे यंदाचा उन्हाळा अतिकडक गेला. यामुळे पाऊसही उशिरा पडण्याचे संकेत आहेत. यामुळेच आम्ही ऑगस्टपर्यंत धरणातील पाणी पुरेल, असे नियोजन केले आहे. वाढीव टंचाई आराखडाही तयार केला आहे."

-अमन मित्तल, जिल्हाधिकारी, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: ५८ व्हिडिओनंतर नवा धक्का... कॅप्टन खरात प्रकरणात SIT ची स्थापना, मध्यरात्री फार्महाऊसमध्ये काय सापडलं?

Success Story: जिद्द, परिश्रमाच्या जोरावर उभारली उत्तुंग यशाची गुढी; कोमल ढवळे यांची सहाय्यक राज्य कर आयुक्त पदावर झेप!

जॉस बटलर निवृत्ती घेणार? T20 World Cup मधील खराब कामगिरीवर अखेर सोडलं मौन; म्हणाला, 'जसं असेल, तसं...'

धुरंधर २ रिलीज होताच दिग्दर्शकाला मागावी लागली माफी, म्हणाले...'आम्ही रात्रभर प्रयत्न करुनही...'

Gold Rate Today: गुढीपाडव्याच्या शुभमूहर्तावर सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT