Death news esakal
जळगाव

Jalgaon News : प्रातर्विधीसाठी गेलेल्या युवकाचा मृतदेह आढळला; सार्वे येथील घटना

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा (जि. जळगाव) : सार्वे बुद्रुक (ता. पाचोरा) येथील २८ वर्षीय युवकाचा हिंगोणे शिवारातील मक्याच्या शेतात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून, हिंस्त्र प्राण्यांचा हल्ला की काही वेगळे कारण आहे, यासंदर्भात पोलिस व वन विभागाचे अधिकारी तपास करीत आहेत. (dead body of 28 year old youth was found in maize field in Hingone Shivar jalgaon news)

सार्वे बुद्रुक येथील सुजित डिगंबर पाटील हा युवक बुधवारी (ता. ३०) सकाळी आठच्या सुमारास गावालगतच्या शेतशिवारात प्रातर्विधीसाठी गेला होता. सायंकाळपर्यंत तो घरी न आल्याने त्याचे वडिलांनी हतनूर येथून परत येत नातलग व ग्रामस्थांसह त्याचा शोध घेतला. परंतु तो मिळून न आल्याने नगरदेवळा दूरक्षेत्र व पाचोरा पोलिसांना कळविण्यात आले.

पोलिस कर्मचारी विनोद पाटील, मनोज पाटील, निवृत्ती मोरे यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीची माहिती घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने परिसरातील शेतशिवारात शोध घेतला. त्याच्या मोबाईलवर संपर्क केला असता मोबाईल रिंग वाजत होती. परंतु तो उचलत नसल्याने प्रातर्विधीच्या ठिकाणी पाहणी केली असता तेथे त्याचा मोबाईल व प्रातर्विधीसाठी नेलेला डबा आढळून आला.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

पोलिस व ग्रामस्थांनी परिसरातील शेतशिवारात शोध घेतला असता हिंगोली शिवारातील राजेंद्र पाटील यांच्या मक्याच्या शेतात त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या डोक्यावर, मानेवर व ओठावर गंभीर जखमा आढळल्या असून, हिंस्त्र प्राण्याने हल्ल्या केला असावा, या संशयाने वन विभागाला कळविण्यात आले. वन अधिकारी मुलानी, पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

सुजितचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणून विच्छेदन करण्यात आले. हिंस्त्र प्राण्याने त्याच्यावर हल्ला केला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. मृत सुजित अंशतः दिव्यांग होता. त्याने संगणक, टायपिंग, एमएससीआयटी असे कोर्स करून पदवी प्राप्त केली होती. गेल्या काही महिन्यांपासून तो नोकरीच्या शोधात व प्रयत्नात होता. एकुलता मुलगा असल्याने त्याच्या आई -वडिलांनी केलेला आक्रोश साऱ्यांनाच हेलावणारा ठरला. पाचोरा व नगरदेवळा पोलिस पुढील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT