death
death esakal
जळगाव

Jalgaon News : कर्जबाजारी दुकानदाराने उचलले टोकाचे पाऊल!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील सिंधी कॉलनीत एका दुकानदाराने नैराश्यातून (Depression) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. १२) घडली. (debt market shopkeeper committed suicide by hanging himself in his house due to depression jalgaon news)

एमआयडीसी पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुभाष कुंदनमल लुंड (वय ५३, रा. सिंधी कॉलनी) असे गळफास घेतलेल्या प्रौढ व्यापाऱ्याचे नाव आहे. सिंधी कॉलनीत सुभाष लुंड आपल्या पत्नी राणीबाई लुंड यांच्यासह वास्तव्याला होते.

परिसरात ते केकचे दुकान चालवून उदरनिर्वाह करत होते. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कर्जबाजारीमुळे त्यांचे दुकान बंद होते.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

त्यामुळे काही दिवसांपासून तणावात होते. शनिवारी रात्री ते जेवण करून झोपले. त्यांची पत्नी राणीबाई या सकाळी उठल्यावर त्यांना पती सुभाष लुंड हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.

त्यांनी शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या मदतीने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. सातपुते यांनी त्यांना मृत घोषित केले. सुभाष लुंड यांच्या आत्महत्याचे कारण समजू शकले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! ED अन् इतर तपास यंत्रणांना चपराक, काय दिला निर्णय?

Medicine Rate: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 41 औषधांच्या किमती होणार कमी, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Air India : टॉयलेटमध्ये बसला, टिश्यू पेपरवर लिहिलं 'बॉम्ब', एअर इंडियाच्या विमानात खळबळ

Latest Marathi News Live Update : मुंबई- अहमदाबाद मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Healthy Diet: ‘पावडर प्रथिनां’च्या अतिसेवनामुळे शरीराला धोका; खेळाडूंना डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT