Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : बेकायदा बॅनर-पोस्टर लावुन महापालिका इमारतींचे विद्रुपीकरण

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील नेताजी सुभाष चौकातील वीज खांब्यावर आणि महापालिका प्रशासकीय इमारतीसमोर विनापरवानगी व बेकायदेशीर बॅनर-पोस्टर लावल्याप्रकरणी शनिपेठ आणि शहर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. (Defacement of municipal buildings by putting up illegal banners posters jalgaon news)

जळगाव शहरातील सुभाष चौकातील एका वीजखांब्यावर महापालिकेच्या विनापरवानगी जाहिरातीचे बॅनर लावले होते. महापालिका अतिक्रमण निर्मूूूलन विभागाच्या पथकाने शुभेच्छा बॅनर हटविले.

महापालिकेचे लिपिक अजय बिऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात नीलेश संजय बाविस्कर (रा. भवानी पेठ) आणि कमलेश प्रभाकर महाजन (रा. नशिराबाद) या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार रवींद्र पाटील तपास करीत आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

महापालिकेसमोर पोस्टर

शहरातील महापालिका प्रशासकीय इमारतीसमोर मुख्य रस्त्यावर राजेश भगवान राजवाणी (वय ४२, रा. आदर्श नगर) यांनी बेकायदेशीर पोस्टर लावून शहर विद्रुपीकरण केले. याबाबत पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना माहिती मिळाली.

त्यांच्या पथकाने रस्त्यावर लावलेले पोस्टर काढून ताब्यात घेतले. याप्रकरणी महापालिका कर्मचारी ईश्वर ठाकूर यांच्या फिर्यादीवरून पोस्टर लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार संजय बडगुजर तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT