Delay in arrival of monsoon farmers attention to rain jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon Rain Update : मान्सूनच्या आगमनाला विलंब; शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Rain Update : जून महिना सुरू झाला, की शेतकऱ्यांना वेध लागतात ते मान्सूनचे. यंदा मात्र ‘अल निनो’च्या प्रभावाने मे महिना अतितापमानाचा गेला. अतितापमानाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसह सर्वांनाच पावसाचे वेध लागले आहेत. (Delay in arrival of monsoon farmers attention to rain jalgaon news)

केव्हा एकदा पाऊस येऊन तप्त झालेल्या भूमीला गारेगार करतो, असे झाले आहे. ७ जूनला मान्सूनचे आगमन होते. यंदा मात्र अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनची वाटचाल काही काळासाठी थांबली आहे.

असे असले तरी आगामी चार दिवस (८ ते १२ जून) जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी पूर्ण केली आहे. केव्हा एकदाचा पाऊस पडून पेरण्यायोग्य शेतजमीन करतो, असे शेतकऱ्यांना झाले आहे. बियाणे, खतांची खरेदी शेतकऱ्यांनी केली आहे. काही अजूनही करीत आहेत, तर काही पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. नंतर ते बियाणे घेतील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पावसाबाबत विविध अंदाज बांधले जात आहेत. गेल्या दोन वर्षांचा अनुभव पाहता, आता पाऊस आला, तर तो खंड पाडेल. नंतर जूनअखेरीस पुन्हा येईल. आलेला पावसाचा खंड दुबार पेरण्यांना कारणीभूत ठरू शकतो.

काही शेतकरी आता पाऊस झाला, तर त्यात पेरण्या करून घेण्याच्या विचारात आहेत. आता पाऊस आला नाही, तरी काळजी करू नका. पुढे पाऊस येईल, अशी आशा करूया. शंभर मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरण्या करू नका, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यामुळे नेमके काय करावे, अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT