Crime News esakal
जळगाव

Child Trafficking : ‘त्‍या’ मुलांप्रकरणी CIDमार्फत चौकशीची मागणी

सकाळ वृत्तसेवा

Child Trafficking : भुसावळ व मनमाड येथून ५९ लहान मुलांना बालमजुरीसाठी नेत असलेल्‍या तक्रारीवरून उतरवून आरपीएफ व जीआरपी पोलिसांनी ताब्‍यात घेतले होते.

परंतु, ही मुले मदरसा येथे अरबी व शालेय शिक्षणासाठी जात होते. (demand government should appoint a SIT and investigate child trafficking matter through CID jalgaon Crime news)

असे असताना तस्‍करीचा गुन्‍हा दाखल केला. यामुळे या प्रकरणाची एसआयटी नेमून शासनाने सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मणियार बिरादरीचे अध्‍यक्ष फारुख शेख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

पत्रकार भवन येथे आयोजित पत्रपरिषदेस महिला बालकल्‍याण विभागाच्‍या प्रदेश समितीच्‍या सल्‍लागार निवेदिता ताठे, राष्‍ट्रवादीच्‍या प्रतिभा शिरसाट, काँग्रेसचे प्रदेश सचिव मुख्‍तदीर देशमुख, अतिक अहमद शेख साबीर आदी उपस्थि‍त होते.

शेख यांनी सांगितले, की दानापूर- पुणे एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाने केलेल्या तक्रारीवरून रेल्वे आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांनी भुसावळ रेल्वे स्थानकांवरील रेल्वेतून २९ व मनमाड येथून ३० मुलांना ताब्‍यात घेतले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

परंतु, मानवी तस्‍करीचा गुन्‍हा नसताना तो गुन्‍हा का दाखल केला?, भुसावळ व मनमाड या दोन ठिकाणी हेतूपुरस्‍कार गुन्‍हा दाखल केला असून अशा दोन ठिकाणी कारवाई का करण्यात आली.

जीआरपी पोलिस म्‍हणत असल्‍याप्रमाणे त्‍यांच्‍यावर कोणाचा दबाव आहे. याच्‍या चौकशीसाठी एसआयटी नेमावी व त्‍याचे अध्‍यक्ष हे हायकोर्टाचे रिटायर्ड जज्ज असावे.

किंवा शासनाने या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची केंद्र शासनाकडे शिफारस करावी. तसेच नाशिक व जळगाव बालकल्‍याण समितीकडे असलेली सर्व मुले त्‍यांच्‍या पालकांकडे सोपवावी किंवा बिहार येथे रवाना करावी; अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून उसाच्या किमतीत वाढ, आता एका क्विंटलमागे किती रुपये मिळणार?

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

Pune Fire : सदाशिव पेठेतील चव्हाण वाड्याला भीषण आग, चार घरांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू

SCROLL FOR NEXT