Ration Shop News esakal
जळगाव

Ration Shop News : रेशन दुकानांवर OTP बंद झाल्याने अडचणी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरासह जिल्ह्यातील रेशन दुकानांवर ‘ई-पॉस’ मशिनद्वारे संबंधित कार्डधारकांचे प्रमाणीकरणासाठी थंब घ्यावे लागते. मात्र, अनेकांच्या अंगठ्याचे ठसे निटपणे येत नाही. यामुळे धान्य वितरण करताना अनेक अडचणींचा सामाना करावा लागत आहे.

गेल्या महिन्यात सुरू झालेली ‘ओटीपी’ सिस्टम पुन्हा सुरू करावी, अशी मागणी रेशन दुकानधारांनी केली आहे.

रेशन दुकानावर धान्य वितरण करताना रेशन कार्डामध्ये ज्यांची नावे आहेत, त्यांना आधार सिंडींग आवश्‍यक आहे. जेणेकरून घरातील कोणीही एक जण आल्यास त्याचा आधार क्रमांक टाकून लागलीच धान्य देणे सोपे जाते. (Difficulties due to closure of OTP at ration shops Jalgaon News)

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

त्यासाठी त्यांचा अंगठाही घ्यावा लागतो. मात्र, रेशन घेणारे अनेक जण कष्टांची कामे करतात. त्यात त्यांच्या अंगठ्यावरील रेषा दिसेनाशा होतात. एकदा घेतलेला थंब पुन्हा उमटत नाही. थंब जुळण्यासाठी तासन्‌तास प्रयत्न करावा लागतो. यात वेळ वाया जातो अन्‌ धान्यवाटप रखडते.

मागील महिन्यात शासनाने थंब येत नसेल, तर घरातील कोणाचाही मोबाईल क्रमांक एकदा ‘ई पास’ मशिनमध्ये फिड करून तो मोबाईल धान्य घेताना आणला, तर त्या मेाबाईलवर जो ‘ओटीपी’ येईल तो टाकल्यास लागलीच धान्य वाटपाचा मार्ग मोकळा केला होता. ओटीपी सिस्टीमध्ये थंबची गरज नसते.

ओटीपीमुळे वेळ वाचतो अन्‌ धान्याचे वाटपही लवकर होते. यामुळे शासनाने धान्य वितरण करताना पुन्हा ओटीपी सिस्टीम सुरू करावी, अशी मागणी जळगाव शहर व ग्रामीण रेशन दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुरवठा मंत्र्यांकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Theft : लॉकरचा पासवर्ड चोरला अन् १७ हजार डॉलर्सवर मारला डल्ला; पुण्यात ऑफिस बॉयचा कारनामा!

Weekend Special Recipe: वीकेंडला घरीच १५ मिनिटांत बनवा हॉटेल स्टाइल 'तंदूर पनीर टिक्का', सगळ्यांचं तोंडात पाणी सुटेल

आजचे राशिभविष्य - 10 जानेवारी 2026

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला काळे कपडे का घातले जातात? कारण ऐकून थक्क व्हाल!

Panchang 10 January 2026: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT