Rescue team personnel undergoing search-rescue training.  esakal
जळगाव

Disaster Management Department : येऊ दे आपत्ती आम्ही सज्ज...! बचाव पथकांचीनिर्मिती; साहित्यही अपडेट

सकाळ वृत्तसेवा

Disaster Management Department : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. ‘अल निनो’मुळे यंदा पाऊस लांबला होता. दमदार पावसाने शेतकरी सुखावला असून, खरिपाच्या पेरणीला लागला आहे.

जळगाव जिल्ह्याला अद्याप ‘रेड अलर्ट’चा इशारा नसला, तरी काही आपत्ती आल्यास नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे.

जिल्हा स्तरावर एक, तालुका स्तरावर आपत्ती निवारण कक्ष स्थापन करून बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. (Disaster Management Department was established and rescue teams were deployed in jalgaon news)

डिजिटल दवंडी सायन

आपत्तीकालीन डिजिटल दवंडी सायन यंत्रणेचे सनियंत्रण हतनूर धरणावरील पाटबंधारे विभागाच्या नियंत्रण कक्षात स्थापित केलेल्या कंट्रोल पॅनलवरून धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या अनुषंगाने होणार आहे.

भुसावळ, यावल, रावेर, जळगाव तालुक्यांच्या सर्व तहसीलदारांनी संबंधित गावांना प्रत्यक्ष भेट देऊन कार्यान्वयन यंत्रणेची खात्री करावी. नदीकाठच्या गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक पोलिसपाटील, कोतवाल यांच्याशी संपर्कात राहावयाचे आहे.

पोलिस दलाला आदेश

वीज वितरण कंपनी, राज्य परिवहन महामंडळ, आरटीओ विभागाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. पोलिस, होमगार्ड यांनाही सतत नियंत्रण कक्षाशी संपर्कात राहून, आपत्ती काळात समन्वयाने कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांना २४ बाय ७ शोध व बचाव पथक, क्यूआरटी पथक तयार ठेवण्याचे आदेश पोलिस, होमगार्ड विभागाला जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शोध- बचाव कार्याचे प्रशिक्षण घेताना बचाव पथकातील कर्मचारी.

अशी आहे सज्जता

शोध बचाव साहित्य--एकूण

रबरी बोट--३

फायबर बोट--२

लाईफ बॉयज--६०

लाईफ जॅकेटस--४००

इन्ल्फेटेबल लाईफ जॅकेट--२००

रिफ्लेक्टीव्ह जॅकेट--२००

फायबर बोट (ओबीएमसह)--२

लाइफ बोयाज (रिंग)--४०

नदीकाठची गावे

जिल्ह्यात नदीकाठची २५ गावे आहेत. त्यात हतूनर, लुमखेड, उदळी बुद्रुक, सावतर, निंभोरा खुर्द, तासखेडा, रणगाव, गहूखेडा, रायपूर, कठोरा बुद्रुक, पिंप्रीसेकम, दुसखेडा, सुतगाव, कंडारी, कासवा कठोरे, अकलुद, अंजाळे, वाघळुद, भानखेडा, बोरावल बुद्रुक, शेळगाव, भालशिव, कानसवाडा यांचा समावेश आहे.

५०० आपदा मित्रांची नियुक्ती

शासनाच्या आदेशाद्वारे प्रत्येक तालुक्यात आपदामित्राची नियुक्ती करण्यात आली आहे. यात एनसीसी, एनएसएस, होमगार्ड, स्वयंसेवी संस्थेतर्फे स्वयंसेवकांची आपदामित्र म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांना मागील महिन्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले आहे. प्रत्येक तालुकास्तरावर हे आपदामित्र कार्यरत आहेत.

"आपत्ती काळात करावयाच्या उपाययोजना, मदत कार्याबाबत जिल्हा व तालुका स्तरावर संबंधित यंत्रणेचे प्रशिक्षण झाले आहे. तालुका स्तरावर शोध व बचाव कार्य पथकांची स्थापना करण्यात आली आहे." -नरवीरसिंह रावळ, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT