जळगाव

Jalgaon Politics News : ...या हास्यामागे दडलंय काय? रश्मी ठाकरे, वैशाली सूर्यवंशी यांच्यातील चर्चेकडे लक्ष

प्रा. सी. एन. चौधरी

पाचोरा : अलीकडच्या काळात राजकीय मंडळींमधील वैचारिक व राजकीय आरोप-प्रत्यारोपांची ओढाताण कमालीची वाढत असून, अत्यंत खालच्या पातळीचे आरोप करत राजकीय मंडळी वैयक्तिक बाब कुटुंबीयांपर्यंत नेत असल्याचे आपण पाहतो व ऐकतो. (Discussion between Rashmi Thackeray Vaishali Suryawanshi attracted attention jalgaon news)

त्यामुळे लहान मुले व तरुण पिढी यांनी काय आदर्श घ्यावा व काय राजकीय आदर्श त्यांच्यापुढे ठेवावा? हा जटिल प्रश्न उपस्थित केला जातो. असे असताना राजकारणात आपलेपणा, संवेदना व आपुलकी असल्याची ही अनेक उदाहरणे दिसतात. त्याची अनुभूती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अर्धांगिनी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) व माजी आमदार (स्व.) आर. ओ. (तात्या) पाटील यांच्या कन्या व उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या भेटीप्रसंगी झालेल्या चर्चा हास्यातून आली.

मालेगाव येथे नुकतीच उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेप्रसंगी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या. या सभेसाठी उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनीही उपस्थिती दिली. विशेष म्हणजे, सभा सुरू होण्याच्या अगोदर पासून ते सभा संपून उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे मार्गस्थ होईपर्यंत वैशाली सूर्यवंशी या रश्मी ठाकरेंसोबत होत्या. सभेप्रसंगी जवळ बसून त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर?

शिवसेना ठाकरे गटाला विरोधकांकडून रोज वेगवेगळे धक्के बसत असताना रश्मी ठाकरे व वैशाली सूर्यवंशी यांच्यातील दिलखुलास चर्चा व दोघांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य उपस्थितांच्या नजरा वेधून घेणारे ठरले. दोघांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह राजकीय दिग्गजांनी या हास्यामागे दडलय काय? असा प्रश्नही उपस्थित केला असावा.

वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांना पाचोरा भेटीचे निमंत्रण दिल्याने पुढील महिन्यात उद्धव ठाकरे यांची पाचोरा येथे जाहीर सभा व निर्मल सीड्स व निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणातील (स्व.) आर. ओ. (तात्या) पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच निर्मल सीड्सच्या अत्याधुनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होण्याचे संकेत आहेत. त्या दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT