Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : डांबरीकरण रस्ते क्रॉंकिटीकरण करण्यावरून संघर्ष; शिवसेना-भाजपमध्ये वाद

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. काही प्रस्तावित आहेत, अशा परिस्थितीत शासनाने मंजूर केलेल्या शंभर कोटी रुपयांतून क्रॉंकिटीकरणाचा प्रस्ताव तयार केला आहे. यात महापालिकेला विश्‍वासात घेतलेले नाही. (Dispute between Shiv Sena and BJP over road Asphalting and concretization jalgaon news)

शासनाने परस्पर निर्णय घेतला. निधीचे नियोजन अत्यंत चुकीचे करण्यात आल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेनेचे गटनेते नितीन लढ्ढा यांनी केला, तर भाजपनेही त्याला जोरदार उत्तर दिले. नितीन लढ्ढा यांनी मांडलेल्या या लक्षवेधीवर महासभेत दोन्ही पक्षातर्फे जोरदार आरोप प्रत्यारोप झाले.

महापालिकेची महासभा सतरा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात शुक्रवारी (ता. २१) सकाळी अकराला झाली. महापौर जयश्री महाजन पीठासीन अध्यक्षा होत्या. उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, प्रभारी नगरसचिव बाविस्कर व्यासपीठावर उपस्थित होते. सभेत ४८ विषय एकमताने मंजूर करण्यात आले, तर एक विषय तहकूब करण्यात आला.

सभेच्या प्रारंभी सत्ताधारी शिवसेनेचे गटनेते नितीन लढ्ढा यांनी लक्षवेधी उपस्थित केली. शहरातील रस्त्यांसाठी शासनाकडून मंजूर झालेल्या शंभर कोटी निधीतून कामांचे चुकीचे नियोजन केल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, की शहरात अद्यापही अमृत योजना, भुयारी गटार योजनांची कामे बाकी आहेत. त्यासाठी आणखी रस्ते खोदावे लागणार आहेत. अशा परिस्थितीत शहरात शासनाच्या शंभर कोटी निधीतून रस्ते कॉंक्रिटीकरणाचा प्रस्ताव दिला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

हे नियोजन अत्यंत चुकीच्या पद्धतीचे आणि अव्यवहार्य आहे. शासनाच्या निधीचा हा पूर्ण अपव्यय होणार आहे. विशेष म्हणजे शासनाने हे परस्पर ठरविले. यात महापालिकेला विचारातच घेण्यात आले नाही, असा आरोप त्यांनी केला.

हे अंत्यत चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. याबाबत आपण भाजप नेते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार करणार आहोत. आयुक्तांनीही याबाबत लक्ष देऊन रस्ते क्रॉंकिटीकरण न करता डांबरीकरण करण्यावर लक्ष द्यावे, त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

भाजपकडून लढ्ढांच्या आरोपाचे खंडण

भाजपकडून नितीन लढ्ढा यांच्या आरोपाचे जोरदार खंडण करण्यात आले. भाजपचे डॉ. अश्‍विन सोनवणे म्हणाले, की राज्य शासनातर्फे शंभर कोटींचा निधी आला आहे, त्यातून रस्ते क्रॉंकिटीकरणाचे नियोजन व्यवस्थित केले आहे. अंबरनाथ शहराच्या धर्तीवर जळगावचे रस्ते होणार आहेत.

त्याला आक्षेप घेण्याची आवश्‍यकता नाही. रस्त्याचे खोदकाम केवळ महापालिकेच्या चुकांमुळे होत असल्याचा आरोप करून ते म्हणाले, की रस्त्याचे काम झाल्यानंतर तब्बल ५५ ठिकाणी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. ते का करण्यात आल्याचे उत्तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी द्यावे, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे रस्ते खोदावे लागले. त्यामुळे रस्ते क्रॉंकिटीकरणावर आक्षेप घेणे योग्य नाही.

भाजप गटनेते राजेंद्र घुगे पाटील म्हणाले, की शहराच्या विकासासाठी राज्य शासनाने न मागता निधी दिला आहे. आमदार सुरेश भोळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निधी आणण्यात योगदान आहे. मात्र, आता कामांबाबत आक्षेप न घेता समन्वयाने मार्ग काढावा. भाजपचे विशाल त्रिपाठी यांनीही वाद न करता समन्वयाने मार्ग काढण्याची मागणी केली.

आमदारांसह गटनेत्यांची बैठक

सत्ताधारी शिवसेना व भाजप यांच्यात या निधीवरून वाद झाला. त्यानंतर दोन्ही गटांच्या सदस्यांनी समन्वयाने निर्णय घेण्यावर भर दिला. रस्त्याचे कॉंक्रिटीकरण न करता डांबरीकरण करण्याबाबत महापालिकेतील सर्व गटनेते, आमदार सुरेश भोळे यांची बैठक घेऊन निर्णय घ्यावा. तो प्रशासनाला कळवावा. त्यावर प्रशासनाने पत्र तयार करून राज्य शासनाला पाठवावे. त्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करावा, असा निर्णय घेण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT