Jalgaon Municipal Corporation sakal
जळगाव

जळगाव : भाजपच्या २९ नगरसेवकांना जळगावमध्ये अपात्रतेची नोटीस

दिलीप पोकळे यांच्या तक्रारीवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या(bjp) २९ नगरसेवकांना नाशिक विभागीय आयुक्तांनी अपात्रतेची नोटीस(Disqualification notice) बजावली आहे, सदस्य दिलीप पोकळे, कुलभूषण पाटील यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.जळगाव महापालिकेत(jalgaon carporation) महापौर, उपमहापौर निवडीच्या वेळी भाजपचे २७ नगरसेवक फुटले त्यांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला. दिलीप पोकळे हे गटनेते नियुक्त केले. त्यानंतर प्रभाग समिती सभापती निवडीत त्यांनी आपलाच पक्ष भाजप असून आपण दिलेल्या उमेदवारास मतदान करावे, असा व्हीप भाजप नगरसेवकांना बजावला.

मात्र भाजप नगरसेवकांनी तो व्हीप स्वीकारला नाही. त्यामुळे दिलीप पोकळे यांनी नगरसेवक सीमा भोळे यांच्यासह २९ नगरसेवकांना अपात्र करावे अशी तक्रार पक्षाचे गटनेते म्हणून नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे केली. त्याची दखल घेत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे(radhakrishna game) यांनी २९ भाजप नगरसेवकांना नोटीस बजावली असून ११ जानेवारीला दुपारी ११ वाजता नाशिक येथे सुनावणी होणार आहे. यात महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना उपस्थित राहण्याचे कळविले आहे.

आज गटनेते पदाचा निकाल : भारतीय जनता पक्षाचे फुटलेले नगरसेवक दिलीप पोकळे यांनी आपलाच भाजप गट असून आपणच गटनेते असल्याचा दावा केला आहे. त्यावर भाजप गटनेते भगत बालांनी यांनी आक्षेप घेतला असून भाजप गटनेते आपणच आहोत, असे म्हटले आहे. त्यावर औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती गडकरी यांच्यासमोर सुनावणी सुरू असून त्याचा निकाल मंगळवारी (ता. ४) लागण्याची शक्यता आहे.

मी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आलो आहे. मी पक्षाचा गटनेता आहे. प्रभाग समिती सभापती निवडीत मी बजावलेला व्हीप नगरसेवकांनी नाकारला त्यामुळे आपण त्यांना अपात्र करण्याची तक्रार दिली, त्यानुसार विभागीय आयुक्तांनी नोटीस बजावली.

- दिलीप पोकळे, भाजप गटनेते, दावेदार.

आम्हाला अद्याप कोणतीही नोटीस मिळाली नाही, मिळाल्यावर आम्ही आमचे म्हणणे मांडू. मात्र फुटीर नगरसेवकांच्या या उलट्या बोंबा आहेत.

- भगत बालानी, गटनेता, भाजप जळगाव महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; वसईजवळ ३.५ तीव्रतेची नोंद, जीवित-वित्तहानी टळली..

Frame Movie Review : माणुसकी की कॅमेऱ्याची लेन्स? नागराज मंजुळे आणि अमेय वाघ यांच्या हटके भूमिकेनं वेधलं लक्ष; वाचा 'फ्रेम' चित्रपटाचा रिव्ह्यू

Pune: जुन्नरच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची नवी पहाट; सुराळे शाळेत आधुनिक संगणक कक्ष सुरू

Racism in Australia : भारतीयांना मारुन टाका अन् त्यांच्या बायका गुलामगिरीसाठी विका... ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषाचा धक्कादायक ऑडिओ व्हायरल

College Student Death : वाढदिवसाच्या 3 दिवस आधीच काळाचा घाला! कोल्हापुरात 18 वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; घरात कोणी नसताना संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT