जळगाव

Teachers Day : जिल्हाधिकारी तास घेतात तेव्हा... सार्वजनिक विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त साधला संवाद

विद्यार्थ्यांशी वर्गात जावून मंगळवारी संवाद साधताना जिल्हाधिकारी आयूष प्रसाद.

सकाळ वृत्तसेवा

Teachers Day : असोदा येथील सर्वोदय एज्युकेशन सोसायटीच्या सर्व विभागातील आजी-माजी शिक्षकांच्या सत्कारावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद कार्यक्रम स्थळी पोचतात आणि मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांना सोबत घेऊन वर्गाकडे मार्गक्रमण करतात.

सार्वजनिक विद्यालयात इयत्ता दहावी ‘ब’च्या वर्गात प्रवेशतात आणि वर्गात सुर उमटतो, ‘साहेब नमस्कार आमच्या वर्गात आपले स्वागत आहे’. (district collector conversation held on occasion of Teachers Day in public school in asoda jalgaon news)

‘मुलांनो कसे आहात?’ जिल्हाधिकारी विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. मुले आनंदाने उत्तरतात छान आहोत. उत्तरासोबतच जिल्हाधिकारी विद्यार्थ्यांशी विज्ञान, इतिहास, मराठी, गणित या विषयांच्या संदर्भात बोलू लागतात. इतिहासाचा प्रश्‍न विचारताना इतिहासातले काय शिकलात? हा प्रश्‍न विचारतात. वर्गातली सादिया पिंजारी उभी राहते आणि ‘साहेब आता इतिहास, राज्यशास्त्र विषयातील संविधानाची वाटचाल हा पाठ सुरू आहे’ असे सांगते.

जिल्हाधिकारी विचारतात भारतीय संविधान निर्मितीच्या वेळेस काय काय घटना घडल्या, याचा अभ्यास शिक्षकांनी घेतलाय का? सादिया पुन्हा उत्तर देण्यास उभी राहते, ‘हो, संविधानाच्या निर्मिती वेळेस भारतीय जनतेच्या न्याय हक्काचा विचार केला गेला’ आणि हळूच पुन्हा जिल्हाधिकारी विचारतात ‘आर्टिकल एक क्या है?’ आणि तेच संबोधतात की देशाचे नाव भारत आणि त्या भारताच्या नावाच्या संदर्भातल्या आर्टिकल आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, याबाबत सविस्तर सांगतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्हाधिकारी अतिशय एकाग्रतेने विद्यार्थ्यांना समजावून सांगत होते. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सहा सुत्री कार्यक्रम अंगिकारल्यास जीवनात सतत यशस्वी होणार आहात, असेही त्यांनी या वेळी सांगितले. द

हावीतील तेजस्विनी ढाके, मिताली भारुळे यांनी जिल्हाधिकारी प्रसाद, शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन परदेशी, उपशिक्षणाधिकारी एजाज शेख यांचे स्वागत केले. संस्था अध्यक्ष विलास चौधरी, चेअरमन उद्धवराव पाटील, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल. जे. पाटील, शुभांगीनी महाजन आदी उपस्थित होते.

अभ्यासाचे सहा मूद्दे

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी शाळेत विद्यार्थ्यांसाबत प्रश्‍न-उत्तर सुरू असतानाच खडू हातात घेतला. फळ्यावर लिहित एकाग्रता, आनंद, शब्द संग्रह, सतत वाचणे, आपल्या ज्ञानाचे उपयोजन करणे, प्रश्‍नांची उकल मांडणी करीत, आकलन करणे, म्हणजे उत्तराच्या समीप जाणे होय. हे सहा मुद्दे दिल्याने यशाचे गमक मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT