Eknath khadse Taunting Statement to MLA Mangesh Chavhan esakal
जळगाव

Eknath Khadse Statement : सरकार तुमचं आहे, चोरीचा गुन्हा दाखल करून चौकशी करा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : आपण चाळीस वर्षे राजकीय क्षेत्रात आहोत, सहकार क्षेत्रातही आहोत, आपला सर्व व्यवहार उघड आहे, कोठेही आपण व परिवाराने गैरव्यवहार केलेला नाही. त्यामुळेच आपण जिल्हा दूध संघातील लोणी व दूध भूकटी प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करून चौकशीची मागणी करीत आहोत. मात्र कुणाच्या तरी दबावाने पोलिस तक्रार दाखल करून घेण्यास तयार नाही या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल लवकरच येईल. आमदार मंगेश चव्हाण यांचे सरकार आहे, त्यांनी सहकार विभागाच्या माध्यमातून चौकशी करावी, असे आवाहनही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी दिले.

जळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार एकनाथ खडसे म्हणाले, की दूध संघातील लोणी व दूध भुकटी प्रकरणी चोरीची तक्रार असताना त्या संबधी गुन्हा दाखल करून चौकशीची गरज आहे. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न करता पाच वर्षाची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी पाच वर्षाचा अहवाल मागितला आहे. वास्तविक चौकशीचा अधिकार सहकार विभागाला आहे. सहकार कायद्यानुसार चौकशीस आमचा आक्षेप नाही. त्यामुळे दबावाखाली ही चौकशी केली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.(District Milk Union Case Eknath Khadse Taunting Statement to mangesh chavan Jalgaon news)

न्यायालयात याचिका दाखल

जिल्हा दूध संघातील लोणी व दूध भुकटी प्रकरणी अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसानी तो नोंदलेला नाही. त्यामुळे आता न्यायालयात त्याबाबत याचिका दाखल करण्यात आली, असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. त्याचा निकालही लवकरच येईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

चव्हाणांवर अब्रूनुकसानीचा दावा

आमदार मंगेश चव्हाण यांच्या आरोपावर बोलताना खडसे म्हणाले, की आमदार चव्हाण यांचा जिल्हा दूध संघाशी काय संबध? ते सभासदही नाहीत, त्यांच्याकडे माहिती कशी आली? त्यांनी ती चोरली काय, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. खडसे परिवारावर ते आरोप करीत आहेत. या प्रकरणी आपण त्यांच्यावर अब्रू नुकसानाचा दावा दाखल करणार आहोत. केवळ तक्रार करणे हाच त्यांचा उद्योग आहे, त्यांनी मागे आरटीओवर आरोप केले, त्याचे काय झाले? त्यांचे सरकार असूनही त्याची चौकशी झाली नाही. दूध संघाचा ताबा घेण्यासाठीही ते रात्री चोरासारखे आले. आम्हाला रात्रीच्या अंधारात त्यांच्यासारखे काहीही करण्याची गरज नाही आणि त्यांनी खुले आव्हान देण्यापेक्षा तेही आमदार आहेत, मीही आमदार आहे. त्यांनी हा प्रश्‍न विधानसभेत मांडावा मीही विधान परिषदेत मांडेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

महाजनांसारखी नौटंकी करीत नाही

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या आरोपांना उत्तर देताना खडसे म्हणाले, की नौटंकी आपल्याला जमत नाही, आपल्याला त्याची गरज नाही. महाजन नौटंकी करतात. त्यांनी कापसाला सात हजारांचा भाव देण्यासाठी उपोषण केले. मात्र सात दिवसांत त्यांचे एक ग्रॅम वजनही कमी झाले नाही. हे उपोषण सोडविण्यासाठी त्यांनी आपल्याला आग्रह केला. त्या वेळी आपला पाय फ्रॅक्चर होता. आपण दिवगत गोपीनाथ मुंढे यांना फोन केला ते हेलिकॅप्टरने जळगावला आले व त्यांनी उपोषण सोडले. त्यानंतर सत्ता आल्यावर कापसाला सात हजार रुपये भाव दिला नाही, असा आरोपही त्यांनी केला. गिरीशभाऊंना सुरक्षेची अडचण होऊ शकते, असा आरोप करून ते म्हणाले, की कारण त्यांच्याभोवती नेहमी ‘गराडा’ असतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Judicial Employees Protest: न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा लवकरच एल्गार; राज्यातील ३४ हजार कर्मचारी समान वेतनासाठी एकवटणार

Dubai Work Reality : दुबईतील झगमगाटामागे दडलंय भयाण वास्तव! भारतीय तरुणाने अवघ्या २ मिनिटांत दाखवली काळी बाजू, पाहा VIDEO

‘स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू’ पाठराखीण मालिकेतील अभिनेत्रींचा मराठमोळ्या लूकमध्ये भन्नाट डान्स, Viral Video

Marathi News Live Updates : पुण्यात पवारांनी भाकरी फिरवली, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आता दोन शहराध्यक्ष

Shiv Sena Split: निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा? ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात दावा; ‘शिवसेनेत नव्हे, विधिमंडळात फूट’

SCROLL FOR NEXT