Congress Sakal
जळगाव

Raver Loksabha Election : रावेर लोकसभा मतदारसंघाची काँग्रेस पक्षातर्फे मागणी करणार : प्रदीप पवार

सकाळ वृत्तसेवा

Raver Loksabha Election : जिल्ह्यात रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जागेची काँग्रेस पक्षातर्फे महाविकास आघाडीकडे मागणी करणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी शुक्रवारी (ता. २७) येथे दिली.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शनिवारी (ता. २८) जिल्ह्यात येत असून, ते शहर व ग्रामीणचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (district president pradip pawar statement Raver Lok Sabha Constituency will be demanded by Congress party jalgaon news)

काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. पवार बोलत होते. या वेळी ज्ञानेश्‍वर कोळी, सुभाष जाधव-देशमुख, संदीप घोरपडे आदी उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले, की प्रदेशाध्यक्ष पटोले यांचा शनिवारी जिल्हा दौरा आहे.

त्यासाठी शुक्रवारी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी श्री. पटोले हे विदर्भ एक्स्प्रेसने जळगाव रेल्वेस्थानकात येतील. शनिवारी सकाळी नऊला ते काँग्रेस भवनाला भेट देतील. त्यानंतर ते गोदावरी महाविद्यालयात जळगाव शहर आणि ग्रामीणच्या बैठकीसाठी उपस्थित राहतील. बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षाचा आढावा ते घेतील. दुपारी एकला ते पत्रकारांशी संवाद साधतील.

बोदवड, अमळनेरमध्ये सभा

बोदवड येथे श्री. पटोले हे दुपारी सभेसाठी उपस्थित राहतील. त्यानंतर मुक्ताईनगर येथे काँग्रेस कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात येईल. तेथून ते धरणगावला रवाना होतील. धरणगावमध्ये पक्षाच्या कार्यालयाचे ते उद्‌घाटन करतील. रात्री नऊला अमळनेर येथे श्री. पटोले यांच्या उपस्थितीत सभा होईल. सभेनंतर ते नंदुरबारकडे रवाना होतील.

जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसबाबत श्री. पवार म्हणाले, की जिल्ह्यात काँग्रेसचे ४९ सेल करण्यात आले आहेत. तसेच, ‘ॲप'च्या माध्यमातून काँग्रेसचे एक लाख दहा हजार सभासद करण्यात आले. बूथरचना करण्यात आली आहे. काँग्रेसतर्फे नुकतीच संवाद यात्रा काढण्यात आली, त्याला जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रावेर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने पूर्ण तयारी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT