Deputy Postmaster Dr. present at the program organized at the post office. Chetan Nikam, Shyamkant Sonawane and staff. esakal
जळगाव

Jalgaon News : टपाल कार्यालयात सजावट अन् आकर्षक रोषणाई; सुखद अनुभवाने ग्राहकही भारावले

आल्हाद जोशी

Jalgaon News : येथील उप डाकपाल डॉ. चेतन निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टपाल कर्मचाऱ्यांनी कार्यालयात एकत्र येऊन स्वखर्चाने टपाल कार्यालयाची आकर्षक सजावट करून दिवाळी साजरी केली.

दीपावलीच्या पार्श्र्वभूमीवर टपाल कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने कार्यालयात सजावट, रोषणाई केली असून, प्रसन्न वातावरण असल्याने ग्राहकांनी देखील या उपक्रमाचे स्वागत केले आहे.(diwali Decoration and attractive lighting in post office jalgaon news)

येथील टपाल कार्यालयात उप डाकपाल डॉ. चेतन निकम यांनी शहरासह ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या टपाल कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन यावर्षी

दिवाळीत वेगळा उपक्रम राबविण्याचे नियोजन केले. सर्व कर्मचाऱ्यांनी डॉ. निकम यांच्या संकल्पनेस पाठिंबा देऊन धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास सर्व कर्मचारी टपाल कार्यालयात एकत्र आले आणि दिवाळीचा आनंद लुटला. या वेळी धन्वंतरी मातेची पूजा करण्यात आली. सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयाची स्वच्छता केली.

तसेच स्वखर्चाने टपाल कार्यालयाची आकर्षक सजावट करून फुलांच्या माळा लावल्या. कार्यालयात व परिसरात आकर्षक रांगोळ्या काढून आकाश कंदील लावण्यात आले होते. सर्व टपाल कर्मचारी व अधिकारी एकत्र कुटुंब पद्धतीने या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमात एरंडोल उपडाक विभागामधील शहरातील १२ आणि ग्रामीण भागातील १५ असे २७ कर्मचारी सहभागी झाले होते.

सर्व टपाल कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाज सांभाळून वेगळा उपक्रम राबवला. आगामी काळात देखील सर्व सण, उत्सव अशाच पद्धतीने स्वखर्चाने साजरे करण्यात येणार असल्याचे उपडाकपाल डॉ. चेतन निकम यांनी सांगितले.

कार्यक्रमात उपडाकपाल डॉ. चेतन निकम यांच्यासह श्‍यामकांत सोनवणे, विजय देसले, दीपक वाघ, संगीता पुरभे, नरेंद्र मुंडके, रोहिदास खुने पिंप्रे, निंबा बत्तीसे, विजय सोनवणे, रवींद्र खोडपे, कैलास जळोदकर, नितेश सोनार, वंदना पाटील (बोरगाव), प्रियंका पवार (विखरण), सुचिता पाटील (टोळी), आसिफ पटेल (सावखेडा), प्रियांका जोगी (हनुमंतखेडा) यांच्यासह सर्व कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, अल्पबचत प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी व ग्राहक सहभागी झाले होते.

टपाल खात्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या महिला सन्मान योजना, सुकन्या समृद्धी योजनेसह सर्व योजनांचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT