Diwali Update About Firecracker
Diwali Update About Firecracker esakal
जळगाव

Diwali Update : सावधान ! फटाक्यांच्या धुरामुळे फुफ्फुसे, डोळे होताहेत निकामी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : दिवाळीच्या मंगल पर्वास वसूबारशेपासून सुरवात झाली आहे. आज धनत्रयोदशी, सोमवारी (ता. २४) लक्ष्मीपूजन आहे. दिवाळीत कोट्यवधी रुपयांचे फटाके फोडले जातात. फटाक्यांचा धूर लहान मुले, वयोवृद्धांच्या नाकातोंडात जाऊन त्यांना श्‍वसनाचे विकार जडतात. तर फटाके हातातच फुटल्याने त्वचेवरही भाजते, रॉकेट उडविताना डोळ्या जवळून ते जाऊन थोडक्यात डोळा वाचल्याची उदाहरणे आहेत.

यामुळे दिवाळी पर्यावरणपूरक साजरी करावी. जास्त धूर सोडणारे, कानठळ्या बसविणारे फटाके फोडू नयेत, असा सल्ला जिल्हा रुग्णालयातील फुफ्फसतज्ज्ञ, शल्य चिकित्सकांनी दिला आहे.

दिवाळी म्हटले, की शेव, लाडू, चकली, शंकरपाळे, चिवडा आदी फराळ आलाच. सोबतच विविध प्रकारचे लाडू घराघरांत तयार झाले असतील. दिवाळीत फराळ करायलाच पाहिजे. दुसरीकडे आनंद म्हणून फटाके उडविले जातात.(Diwali Update Beware Smoke of firecrackers filled the lungs and eyes Jalgaon News)

मात्र तो आनंद काही तासांपुरता असला तरी अनेक वर्षांसाठी फटाक्यांचा धूर, आवाज आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम करीत असतो. दर वर्षी फटाक्यांमुळे लहान मुले भाजले, फटाका हाता फुटून हात भाजला, रॉकेट उडविताना ते डोळ्याजवळून गेले, त्यात डोळा वाचला किंवा निकामी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यामुळे फटाके उडविताना सांभाळूनच उडविले पाहिजेत, अन्यथा गंभीर घटना घडू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

"दर वर्षी फटाक्यांमुळे वायू, ध्वनिप्रदूषण होते. फटाक्यांच्या धुरामुळे फुफ्फुसे २० टक्के निकामी झाल्याचे रुग्ण गतवर्षी दाखल झाले होते. अनेक ज्येष्ठांना ऐकू न येण्याची समस्या निर्माण झाली आहे. दुसरीकडे लहान मुलांनाही तोच त्रास होऊन ते दिवाळीच्या दिवसात रुग्णालयात दाखल होताना दिसतात. फटाका हातात फुटल्यानेही भाजल्याच्या घटना वाढल्या होत्या. फटाके फोडण्याऐवजी त्या पैशांतून गरिबांना फराळ, कपडे द्या. काहींना रोख मदतही करा. पर्यावरणपूरक फटाके फोडावेत. रांगोळ्या काढाव्यात."

डॉ. संगीता गावित, शल्यचिकित्सा विभागप्रमुख, जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

"फटाक्यांचा धूर फुफ्फुसात जाऊन श्‍वसनाचा त्रास होण्याच्या घटना दिवाळीत वाढतात. श्‍वसनाचा त्रास लहान मुले, वृद्ध किंवा ज्यांना दम्याचा त्रास आहे, त्यांना अधिक होतो. या धुरामुळे संबंधितांना ऑक्सिजनही लागू शकतो. धूर श्‍वास नलिकेत गेल्याने व्यक्ती बेशुद्धही पडू शकते. अशा व्यक्तींना तत्काळ रुग्णालयात दाखल करावे लागते. या दिवसांत फराळ अधिक खाल्ला जातो. तो कमी प्रमाणात घ्यावा; अन्यथा अपचन, ॲसिडीटीची त्रास होऊ शकतो."

डॉ. स्वप्नील चौधरी, चेस्ट फिजिशियन

फटाके उडविताना अशी घ्या काळजी ..

* फटाके मोकळ्या जागेत फोडा

* लहान मुले फटाके फोडत असताना मोठ्यांनी सोबत राहावे

* सुती कपडे वापरा

* फटाक्यांची वात पेटविताना तोंड बाजूला करा

* पाण्याची बादली जवळ ठेवा

* कणर्ककश आवाजाचे फटाके फोडू नका

* धूर नाका-तोंडात जाऊ नये, यासाठी मास्क वापरा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT