Collector Ayush Prasad, Municipal Commissioner Vidya Gaikwad, City Engineer Chandrakant Songire etc. while inspecting the ongoing works in the city with the funds of District Planning Committee. esakal
जळगाव

Jalgaon News: DPDCतून होणाऱ्या कामांचा दर्जा तपासणार; जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर कामांसह शासन निर्देशानुसार सुरू करण्यात आलेल्या ‘आपला दवाखाना’च्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.

शहरात झालेल्या विविध विकासकामांच्या दर्जाबाबत त्यांनी माहिती जाणून घेत महापालिका अभियंत्यांना सूचना दिल्या. (DPDC to check quality of works Inspection by Collector Jalgaon News)

नवे जिल्हाधिकारी म्हणून आयुष प्रसाद यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. या पार्श्वभूमीवर ते शहरासह जिल्ह्याचे प्रश्‍न जाणून घेत आहेत. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ते योजना, कामकाजाचा आढावा घेत आहेत.

त्याचाच भाग म्हणून त्यांनी शहरात जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात येणाऱ्या निधीतून महापालिकेमार्फत पूर्ण करण्यात आलेल्या व सुरू असलेल्या कामांची नुकतीच पाहणी केली.

आमदार निधीतून होत असलेले रस्ते, गटार, तसेच अन्य विकासकामांसाठी त्यांनी शहरातील विविध भागांत पाहणी केली. त्या कामांचा दर्जा, गुणवत्ता राखली जातेय की नाही, याची महपालिका अधिकारी व अभियंत्यांकडून माहिती जाणून घेतली.

शासन निर्देशानुसार ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला असून, त्या दवाखान्याचे काम कसे चालते? त्यातील ओपीडी, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीचाही त्यांनी आढावा घेतला.

या वेळी त्यांच्याबरोबर महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे उपस्थित होते. या वेळी त्या-त्या प्रभागातील शाखा अभियंता नरेंद्र जावळे, प्रकाश पाटील, विजय मराठे, मनोज वडनेरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नियमित पाहणी करणार

शहरातील विकासकामांची पाहणी केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देत आपण अशा प्रकारच्या सर्वच कामांवर लक्ष ठेवू.

कामे कशी होताय? त्यांचा दर्जा राखला जातोय की नाही? कामांची त्या-त्या भागातील गरज, मागणी व त्यानुसार कामे होताहेत की नाही, यासंबंधी वेळोवेळी पाहणी करू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले.

या भागांत केली पाहणी

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शिवाजीनगर, पोलन पेठ, जोशी पेठ, वानखेडे सोसायटी, गणेशवाडी, रचना कॉलनी, वर्षा कॉलनी, साने गुरुजी कॉलनी, श्रद्धा कॉलनी या भागांतील डांबरीकरण झालेले रस्ते, काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यांची पाहणी करण्यात आली.

आंबेडकर उद्यानात आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेली कामे, बसविलेली खेळणीची पाहणी करण्यात आली.

उद्यानातील सुशोभीकरणासाठी आवश्यक कामे पूर्ण झालेल्या रस्त्यावर पांढरे व पिवळे पट्टे आखणे, आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT