Literary Dhananjay Gudsurkar honored while inaugurating Bahinabai Sopandev Khandesh Samelan. esakal
जळगाव

Bahinabai Mahotsav : बोलीभाषेतून गांभिर्याने लेखन करण्याची गरज : डॉ. संजीवकुमार सोनवणे

बोलीभाषेचा शास्रीय अभ्यास कठीण असला तरी तो आवश्यक आहे.

सकाळ वृत्तसेवा

Bahinabai Mahotsav : बोलीभाषेत समाजाच्या संस्कृतीचे अंग असते संस्कृती ही समाजाचा अस्मिता असते, त्यासाठी बोलीभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. बोलीभाषेचा शास्रीय अभ्यास कठीण असला तरी तो आवश्यक आहे.

बोलीभाषेतून गांभिर्याने लेखन करण्याची गरज व्यक्त करून वाचन संस्कृतीबाबत गळे काढून न रडता त्याकडे सकारात्मकतेने पाहण्याची गरज आहे, असे विचार संमेलनाध्यक्ष डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी व्यक्त केले. (Dr Sanjeev Kumar statement of Sonavane Need to seriously write from dialect jalgaon news)

पवन चॅरिटेबल ट्रस्ट जळगाव व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्यातर्फे (कै.) पुरुषोत्तम नारखेडे स्मृती सतराव्या बहिणाबाई सोपानदेव खानदेश संमेलनाच्या उद्घाटनाच्या अध्यक्षीय भाषणात केले.

साहित्यिक व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांनी उद्घाटन केले. माजी महापौर विष्णू भंगाळे, जयश्री महाजन, स्वागताध्यक्ष अरविंद नारखेडे, उपप्राचार्य वा. ना . आंधळे, ज्येष्ठ कवी शशिकांत हिंगोणेकर, पौर्णिमा हुंडीवाले, बी. के चौधरी, डॉ. विलास नारखेडे, लिलाधर नारखेडे, रघुनाथ राणे, प्रतिभा खडके उपस्थित होते.

साहित्यीक गुडसूरकर म्हणाले, की ‘मराठीला आपण जगविण्याची गरज नाही. जगण्यासाठी मराठी जगली पाहिजे हा दृष्टिकोन आपण स्वीकारला पाहिजे. मराठीला समृद्ध करण्यात सामान्य माणूसच महत्त्वाचा आहे. प्रारंभी ग्रंथदिंडी काढण्यात आली. ज्योती राणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. संध्या महाजन यांनी आभार मानले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. सोनवणे म्हणाले, की कवी मालतीकांत यांना बहिणाबाई व सोपानदेवांचा साहित्याचा वारसा लाभला होता. १९८१ मध्ये असोदा ग्रामीण साहित्य संमेलन भरवण्यात त्यांचा पुढाकार होता. या संमेलनात मुळेच जळगावकरांना १९८४ मध्ये ५८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याची प्रेरणा मिळाली.

१९९१ मध्ये असोद्याला बहिणाबाईंचा पुतळा उभारण्यात कवी मालतीकांत यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. इतकं मोलाचं योगदान असतानाही कवी मालतीकांत हे पडद्याआड राहिले. त्यांनी १९९९ मध्ये बहिणाबाई व सोपानदेव यांच्या नावानं साहित्य संमेलन सुरू केले. त्यांचा हा वारसा त्यांचे सुपुत्र लिलाधर नारखेडे व डॉ. पुरुषोत्तम नारखेडे यांनी चालवला आहे. हे सतरावं साहित्य संमेलन आहे.

खानदेशच्या दृष्टीने ही अभिमानास्पद आणि गौरवशाली परंपरा आहे. बोलीभाषांना समृद्ध अशी मौखिक परंपरा आहे. या मौखिक परंपरेने जीवनाची शाश्वत मूल्ये जतन करून ठेवली आहेत. बोलीभाषेमध्ये शब्दांचे अनमोल भंडार आहे.

राज्य मराठी विकास संस्थेच्या शब्दकोश समितीचा सदस्य म्हणून बारा वर्षे काम करताना महाराष्ट्रातील अनेक बोलींशी लज्जत अधिकच वाढलेली आहे. बा. भ. बोरकरांपासून ते प्रमिला भिरुड यांच्यापर्यंत अनेक कर्वीच्या कवितेतून बहिणाबाईची बोली प्रकट झाली आहे. बहिणाबाईच्या गाण्यांमुळे समाजाला बोलीभाषेचे महत्त्व समजू लागले.

मराठा शाळा बंदच्या मार्गावर

सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे नुसते पेव फुटले आहे. मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आल्या आहेत. राज्य शासनानेही शाळांचे खाजगीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. भरमसाट देणगी देऊन पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालत आहेत. पाल्याच्या कानावर सतत इंग्रजी पडावं यासाठी आटापिटा सुरु आहे. हे शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने घातक आहे.

मुलाचं मातृभाषेतून होणारं पोषण बंद केल्यानं त्याच्या स्वाभाविक संवेदनांचा अभिव्यक्त होण्याचा मार्ग बंद होत आहे. विषयाचा मूळ गाभा त्यांच्या मनात न रुजता परक्या भाषेतील ज्ञान त्याच्यावर लादले जात आहे. हे कोणाच्या लक्षात येत नाही. मातृभाषेतून शिक्षण म्हणजे त्या प्रदेशातील प्रमाण भाषेतील शिक्षण असते. मराठी ही शहरातील सुशिक्षित, उच्चभू लोकांची भाषा आहे.

मराठी भाषेत निर्माण झालेली पुस्तके आणि त्यांच्यातील धडे हे याच सुशिक्षित लोकांच्या सांस्कृतिक जीवनाचे दर्शन घडवत असतात. शिक्षकही याच मराठीतून शिकवतात. मुलंही याच भाषेतून बोलतात, लिहितात. वास्तविक वाडा वस्तीवर, खेड्यापाड्यात राहणाऱ्या मुलांचा या प्रमाण मराठीशी संपर्क नसतो. ती शाळेत येतात तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची बोली घेऊन येतात.

त्यामुळे या मुलाला पाठ्यपुस्तकाची भाषा आणि शिक्षकाची भाषा कळत नाही. भाषा कळत नसल्याने शिक्षण सोडून जाण्याचे प्रमाण बरेच आहे. ही मुले शाळेपासून वंचित राहतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्राथमिक शाळांमधून विद्यार्थ्यांच्या बोलींतून शिकविण्याची सोय व्हायला हवी. त्यांची पाठ्यपुस्तके त्यांच्या बोलीतून लिहिली गेली पाहिजेत.

सध्या बोलीभाषेतून साहित्य मोठ्या प्रमाणात लिहिले जात आहेत. पण हास्य विनोद, गाणी म्हणजेच बोलीची समृद्धी करणं नव्हे तर बोलीतून गांभीर्याने लेखन झाले पाहिजे. बोलीतील छोट्या छोट्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून आपली बोली समृद्ध केली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT