Drug warehouse fire destroys goods worth lakhs jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon Fire Accident : औषध गुदामाच्या आगीत लाखोंचा माल खाक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील गुजराथी गल्लीमधील दुकानाच्या तळमजल्यावरील औषधांच्या गुदामाला शुक्रवारी (ता. ५) दुपारी साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये लाखो रुपयांचा माल खाक झाला आहे. (Drug warehouse fire destroys goods worth lakhs jalgaon news)

जिल्हापेठ भागातील गुजराथी गल्लीमध्ये सूरज एजन्सी फार्मास्युटिकल्स ॲन्ड डिस्टीब्युटर्स नावाने दुकान आहे. या दुकानाच्या तळमजल्यावर औषधांचा साठा असलेले गुदाम आणि कार्यालय असून, शुक्रवारी हे गुदाम बंद असताना, अचानक आग लागली. एजन्सीतील सहकारी धनंजय बारी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाचे अधिकारी शशिकांत बारी यांना माहिती दिली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यानंतर अग्निशमन दलाच्या चार बंब घटनास्थळी दाखल झाले. दीड ते पाऊण दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, या आगीत लाखो रुपयांचा माल खाक झाला.

यांच्या प्रयत्नांनी नियंत्रण

अग्निशमन दलाचे देविदास सुरवाडे, संजय भोईटे, प्रकाश कुमावत, युसूफ पटेल, रवींद्र सपकाळे, रोहिदास चौधरी, तेजस जोशी, दिलीप पवार, गिरीश खडके, राजेंद्र रानवडे, सरदार पाटील, परमेश्वर सोनवणे आदी जवानांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT