A sand dumper that crushes goats  esakal
जळगाव

Jalgaon News : चिंचोलीजवळ सुसाट डंपरने बकऱ्या चिरडल्या

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : चिंचोली (ता. जळगाव) गावाजवळ मंगळवारी (ता. २८) भरधाव वेगाने शहराकडे येणाऱ्या डंपरने महामार्ग ओलांडणाऱ्या तब्बल १५ बकऱ्यांना चिरडले. स्थानिक ग्रामस्थांनी डंपरचालकाला पकडून एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. (dumper crushed goats near Chincholi jalgaon news)

जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील चिंचोली गावात कैलास लटकन कोळी यांच्याकडे २० ते २५ बकऱ्या आहेत. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी रानात बकऱ्यांना चारून ते दुपारी चिंचोली गावाकडे आले. त्यांच्यासोबत प्रभाकर इखे, गणेश धुमाळ, कैलास पालवे आणि दिदास बागले यांच्याही बकऱ्या होत्या.

कैलास कोळी बकऱ्यांना घेऊन जळगाव-औरंगाबाद महामार्ग ओलांडून नेत असताना, जामनेरकडून जळगावकडे सुसाट येणारा वाळू डंपर (एमएच १९, वाय ७७७३)चालकाने बकऱ्यांना चिरडत नेले.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

या अपघातात एकूण १५ बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनाची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेतली व डंपरचालकाला ताब्यात घेतले. या अपघातात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. डंपरचालकाला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav on Waqf Act : ‘’…तर आम्ही ‘वक्फ कायदा’ कचऱ्याच्या डब्यात टाकू’’ ; तेजस्वी यादव यांचं मोठं विधान!

Mohol Politics : अखेर ठरलं! सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांचा बुधवारी हजारो कार्यकर्त्यासह भाजपात होणार प्रवेश

Jogendra Kawade : फलटण प्रकरणात पडद्यामागील सूत्रधारांचा पण तपास करा

World Cup 2025: टीम इंडियाला धक्का! सेमीफायनलपूर्वी प्रतिका रावल जखमी, चालू सामन्यात सोडावं लागलं मैदान; BCCI ने दिले अपडेट्स

Pune Traffic : पुणे शहरात येणाऱ्या मार्गांवर दुतर्फा कोंडी; सध्यांकाळी रांगा वाढल्या

SCROLL FOR NEXT