Jalgaon Municipal Corporation sakal
जळगाव

जळगाव : आठ इमारती, दहा घरे जमीनदोस्त करणार

महापालिका आज करणार कारवाई; मेहरुण नाल्यातील अतिक्रमण काढणार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिकेतर्फे मेहरूण भागातील नाल्याचे अतिक्रमण हटविण्याची गुरुवारी (ता. ६) मोठी मोहीम राबविण्यात येणार आहे. यात आठ दुमजली इमारती व दहा घरे काढण्यात येणार आहेत. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई होणार आहे.(Jalgaon Municipal Corporation)

मेहरूण भागात वाहत असलेल्या नाल्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण काढून नाल्यावर संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. त्यामुळे हा नाला वाहता होऊन पूर आल्यास कोणतेही नुकसान होणार आहे. महापालिकेकडे या नाल्यावरचे अतिक्रमण काढण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. मात्र, त्याबाबत कारवाई केली जात नव्हती, यासाठी महापालिकेला मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही आवश्‍यक होता. त्यानुसार पोलिसांनी बंदोबस्त देण्याची तयारी दाखविली आहे.(Jalgaon news)

खदाण ते महादेव मंदिर कारवाई

मेहरूण भागातील खदाण ते महादेव मंदिर भागात वाहत असलेल्या नाल्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई होणार आहे. याबाबत माहिती देताना अतिक्रमण विभागाचे सुनील ठाकूर यांनी सांगितले, की हा नाला ३० फूट आहे. मात्र, अतिकम्रणामुळे तो २२ फूट झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात त्याला अनेक वेळा पूर येतो. नाल्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमित बांधकाम करण्यात आले आहे. ते काढण्यात येणार आहे. अतिक्रमणाबाबत नागरिकांनाही माहिती देण्यात आली आहे. त्यांनीही अतिकम्रण काढण्याची तयारी दर्शविली आहे. या कारवाईत आठ दुमजली इमारती व १० घरे काढण्यात येणार आहेत. सकाळी नऊला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात येणार आहे.

पोलिस बंदोबस्त

महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या कारवाईस पोलिस प्रशासनाने बंदोबस्त दिला आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी बुधवारी (ता. ५) या भागाची पाहणी केली आहे. त्यानुसार त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT