Eknath Khadse News
Eknath Khadse News esakal
जळगाव

Jalgaon District Bank | जिल्हा बँकेचे अध्यक्ष देवकर उद्या राजीनामा देणार : एकनाथ खडसे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपद निवडीला ठरल्यानुसार एक वर्ष पूर्ण झाल्याने संचालकांनी अध्यक्ष बदल करायचे ठरविले आहे, त्यानुसार अध्यक्ष गुलाबराव देवकर सोमवारी (ता.६) पदाचा राजीनामा देतील.

नव्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नावेजाहीर करण्यात येईल याबाबतचा निर्णय संचालकांनी एकमताने घेतला आहे.

जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही त्याला सहमती दर्शविली असून उपाध्यक्षपदाबाबत शिवसेना (शिंदे गट) निर्णय घेईल अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, आमदार एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. (Eknath Khadse say district Bank Chairman Devkar resign tomorrow name of new president will be announced during election Jalgaon News)

बँकेच्या अध्यक्षपदाची एक वर्षाच मुदत पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्याबाबत निर्णय घेण्यासाठी आज श्री. खडसे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाची बैठक झाली.

अध्यक्ष गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्‍यामकांत सोनवणे, संचालक प्रदीप देशमुख, डॉ. सतीश पाटील, ॲड. रोहिणी खडसे, घन:श्‍याम अग्रवाल, शैलजाताई निकम, आमदार किशोर पाटील, ॲड. रवींद्र पाटील, संजय पवार, प्रताप हरी पाटील, जनाबाई महाजन, सुनील महाजन आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना श्री. खडसे म्हणाले, बँकेची निवडणूक झाल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला तीन वर्षे अध्यक्षपद, एक वर्षे शिवसेनेला आणि एक वर्षे कॉंग्रेसकडे अध्यक्षपद असेल.

उपाध्यक्षपद दोन वर्षे शिवसेनेकडे, दोन वर्षे कॉंग्रेसकडे तर एक वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे राहील असे ठरले होते, त्यानुसार दोन्ही पदासाठी एक वर्षे पूर्ण झाले आहे, त्यामुळे नियमाप्रमाणे नवीन पदाधिकाऱींनी संधी देण्यात येणार आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

पालकमंत्र्यांचीही सहमती

अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा एक वर्षाचा कालावधी संपल्यामुळे नवीन निवड करण्याबाबत आपण जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यांशी सभागृहातून चर्चा केली, त्यांनीही त्याला सहमती दर्शविली असल्याची माहिती श्री. खडसे यांनी दिली. उपाध्यक्षपद शिवसेनेकडे (शिंदे गट) असल्यामुळे उपाध्यक्षपदाबाबतचा निर्णय त्या पक्षाच्या संचालकांनीच घ्यायचा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संचालकांनी अध्यक्ष बदलाचा निर्णय एकमताने घेतला. त्यामुळे विद्यमान अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी सोमवार (ता. ६) राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे खडसे यांनी सांगितले.

आमदारांच्या बैठकीत निर्णय : पाटील

जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे आहे. श्‍यामकांत सोनवणे हे बँकेचे उपाध्यक्ष आहेत. उपाध्यक्षपद शिवसेनेकडे दोन वर्षासाठी आहे. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, बँकेच्या उपाध्यक्ष बदलायचा कि त्यांनाच पुन्हा मुदतवाढ द्यायची हा निर्णय आमच्या गटाचे सर्व आमदार एकत्र बसून घेणार आहोत. त्याबाबत लवकरच निर्णय जाहीर करणार आहोत.

अध्यक्षपदासाठी चर्चेत नावे

जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे ॲड. रवींद्र पाटील, संजय पवार, प्रदीप देशमुख यांची नावे चर्चेत आहे. नावाबाबतचा अंतीम निर्णय पक्षाचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार घेणार असल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT