Eknath Khadse News esakal
जळगाव

Eknath Khadse: फडणवीसांनी शब्द पाळण्यासह महाजनांनी... एकनाथ खडसेंचे मराठा आरक्षणावर विधान

एकनाथ खडसेंचे मराठा आरक्षणावर विधान: महाजनांनी शब्द पाळण्यासह फडणवीसांनी...

सकाळ वृत्तसेवा

Eknath Khadse : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला शब्द दिला आहे, त्यांनी तो पाळावा व संकटमोचक गिरीश महाजन यांनी मार्ग काढून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. जळगावमध्ये ते मंगळवारी (ता. २१) पत्रकारांशी बोलत होते.

हृदयविकाराचा त्रास झाल्याने खडसे यांच्यावर मुंबई येथे उपचार करण्यात आले. मुंबईहून परतल्यावर ते मुक्ताईनगर येथे गेले. आज पहिल्यांदा ते जळगाव येथे आल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोषात स्वागत केले. (eknath khadse statement on maratha reservation jalgaon news)

खडसे म्हणाले, की आपण आजारी असताना अनेकांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी होत्या. त्यामुळेच आपण यातून बाहेर आलो आहोत. जनतेने हे प्रेम आपल्यावर असेच कायम ठेवावे. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत बोलताना खडसे म्हणाले, की भुजबळ यांनी ओबीसीचे प्रश्‍न सातत्याने आयुष्यभर मांडले. त्यांनी ओबीसीचे कायमस्वरूपी समर्थन केले आहे. त्यांची भूमिका आजची नाही.

त्यांनी ओबीसीसाठी लढा दिला आहे. हे सगळे करत असताना मराठा समाजाविषयी द्वेषाची भावना असण्याचे काही कारण नाही. आपल्या समाजाविषयी आदर बाळगला पाहिजे, परंतु दुसऱ्या समाजाविषयी दुस्वास असता कामा नये, ही भूमिका राजकारणात प्रत्येकाने पाळली पाहिजे, असे मला वाटते.

मराठा समाजाला सरकारने आश्‍वासन दिले

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण देण्याची मुदत दिली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, की मराठा समाजाला आज निर्णय घेतो, उद्या निर्णय घेतो, असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या वेळेस दिले होते.

मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास आपण राजकारण सोडू, असा शब्द फडणवीस यांनी दिला होता. त्यामुळे त्यांनी तो शब्द पाळावा. शिवाय मराठा समाजाच्या अपेक्षा निश्‍चित उंचावलेल्या आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारने भूमिका घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: नागपुरात विजांचा कडकडाटसह पावसाला सुरूवात...

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT