Eknath Khadse and Suresh Jain esakal
जळगाव

Eknath Khadse Statement : सुरेशदादा जैन यांच्या विकासकामांचा दर्जा चांगला

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सुरेशदादा जैन यांच्या जळगावातील विकासकामांतील निविदा घोटाळ्याबाबत आपण तक्रारी केल्या. मात्र, त्यांच्या कामांच्या दर्जाबाबत आपण कधीच तक्रारी केल्या नाहीत. त्यांनी केलेल्या कामांचा दर्जा चांगला होता, अशा शब्दात एकेकाळचे कट्टर विरोधक आमदार एकनाथ खडसे यांनी कौतुक केले. मात्र, आता टेंडर घोटाळे होतच आहे, पण कामाचा दर्जाही चांगला नाही. याला जबाबदार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील आहेत, असा आरोपही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी (ता. ११) जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. त्याचा दर्जा अंत्यत निकृष्ट असल्याचे त्यांना दिसून आले. पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले, की जळगाव शहरात कोणत्याही बाजूला गेले, तर खड्ड्यांविना रस्ते दिसत नाहीत. नागरिक त्रस्त झाले आहेत.

मात्र, एकही जण त्यावर बोलण्यास तयार नाही. जळगावमध्ये झालेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत. यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. या सर्वांची चौकशी व्हावी, अशी मागणी मी राज्य सरकारकडे करणार आहे. मला माहीत आहे ही कामे राज्य सरकारचीच आहेत. त्यामुळे मला न्याय मिळेल की नाही मिळेल, याची आपल्याला शाश्‍वती नाही. मात्र, आपण महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत याबाबत आवाज उठवून सरकारचे लक्ष वेधणार आहोत.(Eknath Khadse Statement Quality of development works of Sureshdada Jain is good Appreciation From Eknath khadse Jalgaon News)

मंत्री महाजन, पाटील कामांना जबाबदार

शहरात होत असलेल्या रस्त्यांच्या निकृष्ट कामांना राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला. जळगाव शहराचे पालकमंत्री गिरीश महाजन होते, ळगाव शहराचा विकास करू, नाही विकास झाला तर मला एक मत देऊ नका, असे गिरीश महाजन यांचे शब्द माझ्याकडे रेकॉर्ड केले आहेत. मी मत मागायला येणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यायाला पाहिजे.

सुरेशदादांच्या कामाचा दर्जा चांगला

शहरातील विकासाबाबत ते म्हणाले, गेल्या पन्नास वर्षात जळगाव शहराचा विकास चांगला होता, पण शहराची अवस्था खराब झालेली आहे. आपण सुरेशदादा जैन यांच्यावर टीका करीत होतो. जे टेंडरमध्ये घोटाळे झाले त्यासंदर्भात टिका केली मात्र कामाच्या दर्जाबाबत मी कधीही टिका केली नाही. त्यांच्या शहराच्या विकासाच्या कामाचा दर्जा अतीशय चांगला होता. आज मात्र टेडरचा मोठ्या प्रमाणात घोटाळा तर झालाच आहे,परंतु कामाचा दर्जाही चांगला नाही त्याचीही तक्रार करावी लागत आहे, त्यामुळे याला जबाबदार पालकमंत्री गुलाबराव आहेत आणि गिरीश महाजन आहेत. जळगावचे स्थानिक आमदार यांना विकासासाठी निवडून दिले आहे, त्यांनी या विरूध्द आवाज उठविला पाहिजे मात्र तेही आवाज उठवित नाही. त्यामुळे आता आपण या संदर्भात लक्ष घालणार आहोत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून आमचे कार्यकर्ते त्या विरूध्द आवाज उठविणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT