Girish Mahajan and Eknath Khadse esakal
जळगाव

...अन् एकनाथ खडसेंना महाजनांकडून शुभेच्छा!

महाजन यांनी खडसे यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

विजय कांबळे : सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) गुरुवारी (ता. ९) विधान परिषदेचा अर्ज दाखल करण्यासाठी विधिमंडळात गेले असता त्या ठिकाणी भाजप (BJP) नेते व माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची भेट झाली. महाजन यांनी खडसे यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पक्षाने राज्यसभा उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. १०) होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या माहितीसाठी महाजन व चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण गुरुवारी (ता. ९) विधिमंडळ परिसरात गेले होते. त्याच वेळी खडसे विधान परिषद उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विधिमंडळ परिसरात दाखल झाले. त्या वेळी त्यांच्यासमवेत कन्या ॲड. रोहिणी खडसे व कार्यकर्ते होते. आमदार महाजन व आमदार चव्हाण विधिमंडळातून बाहेर जात असताना ॲड. रोहिणी खडसे यांनी आमदार महाजन व आमदार चव्हाण आले असल्याची माहिती दिली. त्याच वेळी कार्यकर्त्यांच्या गराड्यात काही पावले पुढे गेलेले एकनाथ खडसे थांबले व ते पुन्हा मागे वळत आमदार गिरीश महाजन व मंगेश चव्हाण यांच्याकडे आले. त्यांनी खडसे यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

श्री. खडसे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांच्या गराड्यातून जात असताना तेवढ्यात समोरून आमदार गिरीश महाजन व मंगेश चव्हाण येताना दिसताच खडसे समर्थकांनी ‘नाथाभाऊ तुम आगे बढो... हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आमदार महाजन यांनीदेखील उपरोधिकपणे भुवया उंचावत या घोषणेला प्रतिक्रिया दिली. या वेळी दोन्ही कट्टर राजकीय विरोधक आमनेसामने आल्याने वातावरण काहीसे गरम झाल्याचे बघायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT