bananas News esakal
जळगाव

Sakal Impact : जिल्ह्यातील 49 हजार हेक्टरवरील केळीला न्याय; पालकमंत्र्याच्या सादेला मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा

Sakal Impact : जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केळी महामंडळ होणे गरजेचे आहे. याबाबत ‘सकाळ’ने सातत्याने वृत्त प्रकाशित केले होते.

सोबतच पालकमंत्री गुलाबराव पाटील त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी मान्य करत केळी विकास महामंडळासाठी १०० कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा केली. (Eknath Shinde announced provision of Rs 100 crore for Banana Development Corporation sakal impact jalgaon news)

जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी ऐतिहासिक निर्णय आहे. यामुळे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून केळीचे उत्पादन घेणे शक्य होणार असून, जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

पालकमंत्र्यांचा पाठपुरावा

मंत्री पाटील यांनी भाषणातून मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या केळी महामंडळाच्या घोषणेसह यासाठी किमान १०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली. शेळगाव धरणावरील उपसा जलसिंचन योजनांसह जिल्ह्यातील योजनांना निधी मिळण्याची मागणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पालकमंत्री पाटील यांनी चार वर्षांपासून केळी महामंडळ स्थापनेसाठी पाठपुरावा केला आहे. गेल्या वर्षी २० सप्टेंबरला पाळधी येथे मुख्यमंत्री शिंदे आले असता, मंत्री पाटील यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसह कृषी मंत्र्यांना साकडे घातले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी (ता. २७) याबाबत घोषणा केल्याने लवकरच केळी विकास महामंडळ अस्तित्वात येणार आहे.

जिल्ह्यात ४९ हजार हेक्टरवर केळी लागवड

जळगाव जिल्हा केळीचे आगार समजले जाते. जिल्ह्यातील तब्बल ४९ हजार हेक्टरवर केळीची लागवड होत असून, यातून वार्षिक सहा हजार कोटींची उलाढाल होत असते. केळी विकास महामंडळामुळे शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून केळी उत्पादन घेता येणार आहे. यामुळे मंगळवार जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी ऐतिहासिक ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price: सोन्याच्या भावात मोठी वाढ; चांदीने गाठला नवीन उच्चांक, जाणून घ्या काय आहे भाव?

Latest Marathi News Live Updates : बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Viral Video: गोरिलाचा आशिक अंदाज... महिलेसोबत फ्लर्ट करत होता, प्रेयसी आली अन् त्यानंतर जे घडलं ते तुम्हीच पाहा...

Supreme Court: अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य समजून घ्या; समाजमाध्यमांच्या वापराबाबत ‘सर्वोच्च’सल्ला

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरण ७६% भरलं; मराठवाड्याला दिलासा

SCROLL FOR NEXT