old man injured by rain News esakal
जळगाव

Jalgaon News : वादळामुळे भींत कोसळून वृद्ध जखमी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पावसाच्या शिंतोड्यांसह सुसाट वारा-वादळामुळे जळगावात निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळल्याची घटना शिरसोली रोडवर घडली.

यात हॉटेलमध्ये काम करणारा वृद्ध गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. (Elderly injured as wall collapses due to storm Jalgaon Rain Update News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शिरसोली रोडवर बांधकाम सुरू असलेल्या पाच मजली इमारतीची भींत वादळी वाऱ्यामुळे कोसळली.

इमारतीच्या बाजूला असलेल्या सप्तश्रृंगी भरीत सेंटरवर ही भिंत पडून हॉटेलमध्ये बसलेले सुप्रीम कॉलनी येथील रहिवासी राजेंद्र सजनसिंग पाटील गंभीर जखमी झाले.

त्यांना जखमी अवस्थेत आकाशवाणी चौकातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत हॉटेलचेही मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील पुर्णेकर कुटुंबियांच्या भेटीला आदित्य ठाकरे आणि संजय राऊत दाखल

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT