Electricity generation by setting up solar panels at some railway stations.  esakal
जळगाव

Jalgaon News : प्रवासी आले की लागतील दिवे अन्‌ बंदही होतील!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : भुसावळ रेल्वे विभागातील विद्युत विभागाने आठ रेल्वेस्थानकांवर नव्याने स्वयंचलित दिवे लावले आहेत. भुसावळ विभागात प्रथमच बडनेरा, भुसावळ, नांदगाव, दुसखेडा रेल्वेस्थानकांवर स्वयंचलित प्रकाशव्यवस्था केली आहे. (Electricity Department of Bhusawal Railway Division has installed new automatic lights at 8 railway stations jalgaon news)

प्रवासी ठराविक ठिकाणी उपस्थित नसतील, तर दिवे आपोआप बंद होतील. प्रवासी आले, की आपोआप लागत जातील, अशी ही यंत्रणा आहे. त्यामुळे रेल्वेची ३९ हजार ३७० युनिट विजेची बचत होईल, तर तीन लाख ४२ हजार रुपयांची वीज वाचून खर्चात बचत होणार आहे.

२०२२-२३ या आर्थिक वर्षात रेल्वेस्थानकांवरील विजेशी संबंधित कामे सुधारण्यासाठी विद्युत अभियांत्रिकी सामान्य विभागाने विविध कामे भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे प्रबंधक एस. एस. केडिया यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता जे. पालटासिंह यांच्या नेतृत्वाखाली केली आहेत.

भुसावळ विभागात मूर्तिजापूर, पाचोरा, मनमाड, मलकापूर, बडनेरा, देवळाली, नांदुरा, धुळे आठ रेल्वेस्थानकांवर नवीन दिवे लावले आहेत. भुसावळ विभागात बडनेरा, रावेर, सावदा स्थानकावर मोठे हायमास्ट दिवे लावले आहेत. रस्त्यावर, स्टेशन भागात पथदीप लावले आहेत.

भुसावळ विभागात प्रथमच बडनेरा, भुसावळ, नांदगाव, दुसखेडा रेल्वेस्थानकांवर स्वयंचलित प्रकाशव्यवस्था लावली आहे. प्रवासी ठराविक ठिकाणी उपस्थित नसतील तेव्हा दिवे आपोआप बंद होतील आणि प्रवासी आले, की आपोआप लागत जातील, अशी यंत्रणा वर्षभरात कार्यान्वित करण्यात आली आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

भुसावळ विभागात प्रथमच मनमाड रेल्वेस्थानकावर कोचिंग ट्रेन सबस्टेशनचे ११ केव्ही/७५० व्होल्टचे नवीन युनिट सुरू झाले. यामुळे ३९ लाखांची बचत होत आहे.

अमरावती स्थानकाच्या छतावर १२५ किलोवॉटचा नवीन प्लांट बसविला. त्यातून पाच लाख ७२ हजारांची बचत दर वर्षी होते. विभागात आठ नवीन लिफ्ट सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात मनमाडला दोन, अमरावतीला दोन, नाशिकला एक, भुसावळ येथे एक, जळगाव येथे एक, अकोला येथे एक लिफ्ट सुरू करण्यात आली आहे.

भुसावळ विभागात या वित्तीय वर्षात दोन नवीन एस्केलेटर लावले. त्यात नाशिक व अकोला येथे प्रत्येकी एकाचा सामावेश आहे. विभागात जुन्या व उपयोगात न येणाऱ्या भंगार विक्रीतून ३५ लाखांचे राजस्व मिळाले आहे.

"भुसावळ विभागात विद्युत विभागाने केलेले कार्य खूप चांगले आहे. स्वयंचलित विद्युत दिवे सर्व स्थानकांवर लावण्याचा प्रयत्न केले जातील. त्यामुळे वीज व पैशांची बचत होईल." -एस. एस. केडिया, रेल्वे डीआरएम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT