strike esakal
जळगाव

Employee Strike : संपामुळे रब्बी नुकसानीचे पंचनामे करण्यात अडचणी; संपाचा तिसरा दिवस!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) रद्द करून जुनी पेन्शन (OPS) योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी आणि इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांतील सुमारे ४५ हजार कर्मचारी संपावर गेले आहेत. (employee strike old pension scheme Difficulties in assessing loss of Rabbi jalgaon news)

या संपाचा गुरुवारी (ता. १६) तिसरा दिवस होता. गुरुवारीही कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून घोषणाबाजी केली. संपात कृषी विभागाचेही कर्मचारी सहभागी झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे कोण करणार, असा प्रश्‍न कृषी अधिकाऱ्यांसमोर उभा आहे.

संपामुळे कर्मचारी नसल्याने शासकीय कार्यालये ओस पडली आहेत. अधिकारी व होमगार्डद्वारे काही नित्याची काम करवून घेतली जात आहेत. असे असले, तरी प्रत्यक्ष कामकाज ठप्प असल्याने फाईल पेंडीगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

गुरुवारीही कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘एकच मिशन जुनी पेन्शन’, ‘हमारी मांगे पुरी करो’, ‘कोण म्हणतं देणार नाही’, ‘घेतल्याशिवाय राहणार नाही’, ‘हम सब एक है’, ‘हमारी युनियन हमारी ताकद’, ‘राज्य कमचारी संघटनेचा विजय असो’, आदी घोषणा देत कर्मचाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला होता.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर जिल्हा परिषद महासंघ समितीच्या निर्णयानुसार विविध विभागांच्या संघटनांनी हा संप पुकारला आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, मस्त्य विभाग, बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, भूमिअभिलेख कार्यालय, आरोग्य कर्मचारी, शिक्षक कर्मचारी संघटनेसह विविध संघटनांनी संपात सहभाग घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल; नीट प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारचा घेणार ताबा

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनचे पडसाद! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरून प्रवास; मोर्चा काढत केंद्र सरकारवर टीका

Sangli Wall Collapse : मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमाला गालबोट; वादळी वाऱ्यामुळे अंगावर चिरा-विटांची भिंत कोसळून 5 ते 6 भाविक ठार, 12 जण जखमी

SCROLL FOR NEXT