Excavation of new roads for tap connection of Amrut scheme continues in jalgaon news 
जळगाव

Amrut Yojana : ‘अमृत’च्या नळ कनेक्शनसाठी नवीन रस्त्यांवर खोदकाम सुरूच; जिल्हापेठ ठाण्यासमोर खोदला रस्ता

सकाळ वृत्तसेवा

Amrut Yojana : अनेक वर्षांपासून रस्त्यांमधील खड्ड्य़ांमुळे बेजार झालेल्या जळगावकरांना दोन वर्षांत काही ठिकाणच्या नव्याने झालेल्या रस्त्यांनी दिलासा मिळाला. मात्र नव्याने डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवरही आता ‘अमृत’ योजनेतंर्गत नळ कनेक्शन घेणाऱ्यांनी चाऱ्या खोदून ठेवल्याने रस्त्यांची पुन्हा वाट लागली आहे. विशेष म्हणजे, सामान्य नागरिक नव्हे, तर शैक्षणिक संस्था, पोलीस ठाण्याने नळजोडणीसाठी रस्ते खोदून ठेवल्याचे वास्तव समोर आले आहे.

जळगाव शहरात गेल्या सात ते आठ वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यात शहरात राबवण्यात आलेल्या ‘अमृत’ योजनेतील पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेतील कामांमुळे प्रमुख रस्त्यांसह नागरी वस्त्यांमधील जवळपास ९० टक्के रस्ते खोदण्यात आले. (Excavation of new roads for tap connection of Amrut scheme continues in jalgaon news)

अमृत योजना पूर्ण करण्याची मुदत दोन वर्षांची असताना कामे पूर्ण होण्याला जवळपास सहा वर्षे लागली. अद्याप या योजनेतील कामे शंभर टक्के पूर्ण झाली नाहीत. आधीच रस्त्यांची दुरवस्था, त्यात अमृत योजनेंतर्गत रस्ते खोदल्याने जळगाव शहर शंभर टक्के खड्ड्य़ात गेले.

रस्त्यांची कामे आणि अडथळे

गेल्या काही वर्षांत जळगाव शहरातील केवळ रस्त्यांच्या कामासाठी स्वतंत्रपणे कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला. त्यातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ४२ कोटींची कामे प्रस्तावित होती. रस्त्यांची कामे सुरू होण्याआधी अमृतची कामे पूर्ण करण्याबाबत वेळोवेळी सूचना दिल्यानंतर ही योजना रखडली व जळगावकर चांगल्या रस्त्यांपासून सात ते आठ वर्षे वंचित राहिलेत.

रस्त्यांची कामे सुरू होऊन काही ठिकाणी पूर्ण झाल्यावर महापालिकेने जलवाहिनी दुरुस्ती, व्हॉल्व्ह दुरुस्ती, अमृत योजनेंतर्गत जलवाहिन्यांची जोडणी यासाठी नव्याने तयार रस्त्यांवर जेसीबी चालवणे थांबवले नाही. त्यामुळे नवे रस्तेही अनेकदा खोदले गेले.

आता कनेक्शनसाठी खोदकाम

अमृत योजना कशी तरी पूर्ण होत असताना नागरिकांसह अन्य सर्व प्रकारच्या मालमत्ताधारकांना रस्ता तयार होण्याआधी नळजोडणी करून घेण्याचे महापालिकेने आवाहन केले. काही नगरसेवकांनी वॉर्डात फलक लावले. मात्र तरीही नागरिक व संस्था सुधारायला तयार नाहीत. खराब झालेल्या मु.जे. महाविद्यालयासमोरील रस्त्याचे काम सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले.

मात्र ओरियन शाळेसमोर, कॉलेजसमोर या कॅम्प्समधील कनेक्शनसाठी डांबरी रस्ता तीन ठिकाणी खोदण्यात आला आहे. आयएमआर महाविद्यालयासमोर नळ जोडणीसाठी नव्या रस्त्याला चारी मारण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर जिल्हापेठ पोलीस ठाण्याने चांगल्या रस्त्यावर खोदकाम करून कनेक्शन घेतले आहे. इतर ठिकाणी घरगुती व व्यावसायिक वापरासाठी कनेक्शन घेताना हाच प्रकार सुरू आहे.

दुरुस्तीची जबाबदारी कुणाची?

रस्ते तयार केल्यानंतर त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मक्तेदार एजन्सीला दोन वर्षे दोष दायित्व कालावधी देण्यात आला आहे. मात्र अशा प्रकारे नळजोडणीसाठी रस्ते खोदले जात असतील, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्‍न शहरवासीय उपस्थित करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT