Jalgaon District Bank esakal
जळगाव

Jalgaon District Bank : जिल्हा बँकेच्या शेतकरी सभासदांच्या कर्जफेड योजनेला मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon District Bank : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी सभासदांसाठी लागू करण्यात आलेल्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ग संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष संजय पवार यांनी दिली. (Extension of one time loan repayment scheme for farmer members of district Bank jalgaon news)

जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. १७) झाली. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा संचालक अनिल पाटील, उपाध्यक्ष अमोल पाटील, आमदार चिमणराव पाटील, गुलाबराव देवकर, प्रदीप देशमुख, घनश्‍याम अग्रवाल, विनोद पाटील, शैलजा निकम, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.

संचालक मंडळाच्या बैठकीत अनिल पाटील यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याबददल सत्कार करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बैठकीत वसंत सहकारी साखर कारखाना आणि मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेण्यात आली. शेतकर्‍यांसाठी एकरकमी कर्जफेड योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असलयाचे अध्यक्ष संजय पवार यांनी सांगितले.

खडसेंसह संचालक गैरहजर

जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक आमदार एकनाथ खडसे यांच्यासह माजी अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे, मेहताबसिंग नाईक, ॲड. रवींद्र पाटील, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील हे संचालक आजच्या बैठकीस गैरहजर होते. .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan Road Accident : पैठणमध्ये पिकअपची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - २२ जून २०२६

एकतर्फी निकाल की धक्कादायक उलथापालथ? काँग्रेसच्या तटस्थ भूमिकेचा फायदा कुणाला? अमरावती विधानपरिषदेचा आज फैसला

Industrial Pollution : कुरकुंभ एमआयडीसीतील ‘हार्मनी ऑर्गेनिक्स’वर प्रदूषण प्रकरणी कडक कारवाई; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उत्पादन तत्काळ बंद करण्याचे आदेश

उत्तम गुंतवणूक : निफ्टी इंडिया डिफेन्स निर्देशांक : गुंतवणुकीची आकर्षक संधी

SCROLL FOR NEXT