A farmer turning a 'rotovator' in a cotton field.  esakal
जळगाव

Jalgaon Fake Fertilizer News : उभ्या कपाशीवर फिरवला ‘रोटोव्हेटर’; बोगस खतामुळे शेतकऱ्याचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fake Fertilizer News : तालुक्यातील खेडी येथील एका शेतकऱ्याने उन्हाळ्यात लागवड केलेल्या कापसाच्या पिकावर चक्क ट्रॅक्टर फिरवत रोटोव्हेटर चालवून क्षणार्धात उभे असलेले पीक आडवे केले आहे.

खेडी (ता. अमळनेर) येथील उमेश धनराज पाटील यांनी जूनच्या पहिल्याच आठवड्यात आपल्या आठ एकरावर उन्हाळी कापसाची लागवड केली होती. परंतु आज अडीच महिने उलटून देखील कापूस पीक परिपक्व होत नसल्याचे लक्षात आले. (farmer drives rotavator over planted cotton crop jalgaon news)

याची त्यांनी कारण मीमांसा त्यांनी केली व त्या अंती कळाले की, सरदार कंपनीची खताची मात्रा दिल्यामुळे हे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले. यातच त्यांनी आज धाडसी निर्णय घेतला आणि आपल्या कापसाच्या उभ्या पिकावर भावनिक होत रोटाव्हेटर फिरवला. तो पुढील पीक सापडेल या आशेवर.

दरम्यान, जड अंतकरणाने कापसाच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवताना उमेश पाटील यांच्या डोळ्यात अश्रू तराळलेले होते. एकीकडे निसर्गाच्या भरवशावर शेतकरी लाखांची उधळण करीत असतो तर दुसरीकडे, बळिराजाची आर्थिक लूट व्हावी, याच उद्देशाने कमी काळात धनाढ्य होण्याची संधी खत कंपन्या शोधत असतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तालुक्यात बऱ्याच शेतकरी बांधवानी सरदार कंपनीचे खत घेतले असून, हे खत बोगस असल्याचे निष्प्पन्न झाले आहे. मात्र कृषी केंद्र संचालक यांनी रातोरात धनाढ्य होण्याच्या बेतात कष्टकरी शेतकऱ्याचे नुकसान केले आहे. शासनाने तत्काळ कार्यवाही करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन खत उत्पादक कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी होत आहे.

शेतकरी बांधव कृषी केंद्र संचालक यांच्यावर विश्वास ठेवून बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके खरेदी करतो. मात्र काही कृषी केंद्र संचालक सर्रास बोगस खते, बियाणे आणि अवाजवी दरात कीटकनाशके विक्री करतात. मात्र संबंधित अधिकारी दुर्लक्ष करतात, असाही आरोप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. अशा कृषी केंद्रांवर जाऊन चौकशी करावी, असाही सूर उमटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकबराच्या बापाचा बाप, बापाचा बाप, बापाचा बापही पैदा झाला नव्हता तेव्हा...; कुंभमेळ्यावरून फडणवीस गरजले

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात येतोय शेतात राबणारा काळ्या आईचा पुत्र

माेठी बातमी! शक्तिपीठ महामार्गाचा नवा आराखडा ‘व्हायरल; उत्तर सोलापूर, सांगोला वगळून माढा, माळशिरसमधून जाणार !

Latest Marathi News Live Update : प्रभाग 59 मध्ये अपक्ष उमेदवार सचिन शिवेकर यांना मुंबई डबेवाला संघटनेचा पाठिंबा

भाजपकडून पैशांच्या पाकिटांचं वाटप, शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडलं; VIDEO आला समोर

SCROLL FOR NEXT