Death News esakal
जळगाव

Jalgaon News : झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील वासरे येथील ५१ वर्षीय शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे.

वासरे येथील भागवत प्रकाश पाटील (वय ५१) यांनी शनिवारी (ता. ९) पहाटे सहापूर्वी गावाबाहेरील अमरधामजवळील निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. (farmer end his life by hanging himself from a tree jalgaon suicide news)

ही घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मृत भागवत पाटील यांच्याकडे दोन बिघे कोरडवाहू शेती असून, त्याच्यावरच त्यांचा व पत्नीचा उदरनिर्वाह सुरू होता.

त्याच्या मुलाचा काही वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता व मुलीचे लग्न झाले असून, त्यांच्या पश्चात आता पत्नी, मुलगी आणि जावई असा परिवार आहे. मारवड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT