A farmer carrying a banana leaf on his body and a bunch of bananas on his head to give a statement regarding banana crop insurance. esakal
जळगाव

Jalgaon Farmer Protest : अंगावर बांधली केळी अन्‌ पानेही; केळी पिक विम्याबाबत केळीच्या पानावर निवेदन

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Farmer Protest : केळी पिक विम्याची रक्कम त्वरीत द्या, केळीवरील सीएमव्ही रोगाची नुकसान भरपाई मिळावी, नुकत्याच झालेल्या पावसाने तापी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या केळीचे नुकसान झाले आहे. (farmer protest in unique style for banana crop insurance jalgaon news)

त्याची नुकसान भरपाई त्वरीत द्यावी, यासह विविध मागणयांसाठी सोमवारी (ता. १८) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदेालन करण्यात आले.

आंदोलकांनी अंगावर केळीची पाने लपेटली होती, तसेच केळीचे घड आणून आंदोलन केले. विशेष म्हणजे, या संदर्भातील निवेदनही केळीच्या पानावर लिहून देण्यात आले.

तापी परिसरातील शेतकऱ्यांनी स्वभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्ववाखाली सोमवारी अनोखे आंदोलन केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्या शिवाय राहणार नाही’, पिक विम्याची भरपाई द्या, केळीवरील सीएमव्ही रोगाची भरपाई द्या, २०१९ मधील नुकसान भरपाई द्यावी, नूकत्याच झालेल्या पावसाने तापी किनार पट्टीतील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

त्याचे पंचनामे त्वरीत करून भरपाई देण्यात यावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. अध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे, हेमंत पाटील, नारायण पाटील, मयूर पाटील आदींसह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT