Five bike thefts within a week from the district 
जळगाव

बैल खरेदीस आलेल्या शेतकऱ्याची लांबविली दुचाकी!

कृषी उत्पन्न बाजार समितीत बैल खरेदी करण्यासाठी आलेल्या एका शेतकऱ्याची दुचाकी अज्ञाताने लांबवली होती.

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १४ मे रोजी बैल खरेदी करण्यासाठी आलेल्या एका शेतकऱ्याची दुचाकी अज्ञाताने लांबवली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त, विजय रामराव महाले (वय, ४२) रा. शिरूड ता. मालेगाव जि. नाशिक हे बैल जोडी खरेदी करण्यासाठी चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे १४ मे रोजी आले होते. तत्पूर्वी त्यांनी आपली मोटारसायकल (क्र.एम.एच. ४१ एजे ६३८८) बाजार समितीच्या गेटजवळ लावली. त्यानंतर बैल जोडी खरेदीसाठी ते बाजारात गेले. काहीवेळाने महाले हे मुळ जागी परतले. तेव्हा त्यांना उभी केलेली मोटारसायकल दिसून आली नाही. त्यावर महालेंनी परिसरासह घाट रोड, बस स्थानक, भडगाव रोड, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी शोधाशोध केली. परंतु ३५ हजार रुपये किंमतीची मोटारसायकल आजपावेतो मिळून आली नाही. यावर विजय रामराव महाले यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोना महेंद्र पाटील हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

'ठरलं तर मग' मालिका अर्जुन सुभेदार सोडणार? अमित भानुशाली पात्राबद्दल बोलताना म्हणाला, 'आता वेळ आलीय, मी आयुष्यभर...'

Amravati Jail news : आठवड्याभरात तिसऱ्या बंदीचा मृत्यू ;जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील घटनेमुळे खळबळ

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

SCROLL FOR NEXT