Gram Gram
जळगाव

आधारभुत खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ; हरभऱ्याला व्यापाऱ्यांकडे मिळतोय भाव

ऑनलाईन नोंदणीपूर्वीच जिल्ह्यातील बहुतांश केंन्द्रांवर शेतकर्‍यांनी मोठया प्रमाणावर गर्दी केलेली दिसून येत होती.

देविदास वाणी


जळगाव : जिल्ह्यात शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत (government shopping center) रब्बी हंगामातील हरबरा खरेदीसाठी १५ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात १४ केंद्रावर नोंदणीसाठी सुरूवात करण्यात आली होती. आतापर्यंत ७ हजार शेतकऱ्यांनी (farmer) हमीदर खरेदी योजनेंतर्गत आॅनलाईन नोंदणी (Online registration) केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १४ केंद्रावर हरभरा खरेदी करण्यात येत आहे. जामनेर तालुक्यातील खरेदी केंद्रावर आतापर्यंत सुमारे २०० क्विंटल हरभरा (Gram) खरेदी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा मार्केटींग अधिकारी गजानन मगरे यांनी दिली. असे असले तरी खासगी व्यापाऱ्यांकडे (private merchants) अधिक दर (Higher rates) मिळत असल्याने शेतकरी व्यापाऱ्यांना हरभरा विकत असल्याचे दिसून येते.

(farmer Gram sell private merchants Higher rates)

जिल्हयात रब्बी हंगामी उत्पादनाची शासनाच्या हमीभाव खरेदीअंतर्गत हरबरा उत्पादनासाठी जिल्ह्यात १४ केंद्राना तत्वतः मान्यता देण्यात आली. या केन्द्रांवर ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणीपूर्वीच जिल्ह्यातील बहुतांश केंन्द्रांवर शेतकर्‍यांनी मोठया प्रमाणावर गर्दी केलेली दिसून येत होती. शासन आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडतर्फे जळगाव, अमळनेर, पारोळा, रावेर, जामनेर, पाचोरा, चोपडा, भडगाव, चाळीसगाव शेतकरी सहकारी संघ, अण्णासाहेब पाटील सहकारी फ्रु टसेल सोसायटी पाळधी, जळगाव जिल्हा कृषी औद्योगीक सेवा संस्था, कोरपावली विकासो यावल अशा १४ केन्द्रांवर हरबरा खरेदीसाठी आनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. हरभरा खरेदी ५१०० रूपये प्रतिक्विंटल दराने होत आहे.

तूर खरेदीसाठी गत २८ डिसेंबर २०२० पासूनच ऑनलाईन नोंदणीसह खरेदीस सुरूवात करण्यात आली आहे. तूर उत्पादनासाठी शासन हमीभाव ६०००रूपये प्रति क्विंटल असून १४ केंद्र कार्यान्वित करण्यात आली होती. तूर खरेदीसाठी ७२७ शेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. मात्र नोंदणी झालेली असले तरी आधारभूत किंमतीपेक्षा खाजगी व्यापाऱ्यांकडे ४०० ते ५०० रूपये जास्त दर मिळत असल्याने शेकऱ्यांनी शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेकडे पाठ फिरवलेली असल्याचे दिसून आले आहे.

हरभरा खरेदीसाठी ५१०० रूपये प्रतिक्विंटल दर असून हेक्टरी १० क्विंटल ९० किलोनुसार हमीदर खरेदी योजनेंतर्गत हरभरा खरेदी करण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी मोबाईल संदेश प्राप्त झाल्या नुसार आपले हरबरा उत्पादन खरेदी केंद्रावर मोजणीसाठी आणावे. आधार कार्ड, चालू वर्षातील हरबरा पिकाची नोंद असलेला ऑनलाईन ७/१२ उतारा नोंदी सोबत असणे गरजेचे आहे.

गजानन मगरे,
जिल्हा विपणन अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Acid Attack : राजधानी दिल्लीत संतापजनक घटना! महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर भररस्त्यात ‘अ‍ॅसिड’ हल्ला

Uttar Pradesh News : सीएम योगींची दिल्लीत पीएम मोदींशी भेट, सुमारे एक तास चर्चा; मंत्रिमंडळ विस्तारावर मंथन?

New CJI Appointment 2025 : कोण होणार देशाचे नवे सरन्यायाधीश? बीआर गवई यांनी केली नावाची घोषणा...

INDW vs BANW: राधा यादवसह भारतीय गोलंदाजांचा बांगलादेशविरुद्ध तिखट मारा, वर्ल्ड कप सेमीफायनलपूर्वी सोप्या विजयाची संधी

Noida International Airport : नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख लवकरच ठरणार! मोदी करणार उद्घाटन?

SCROLL FOR NEXT