crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : बापलेकीवर हल्ला प्रकरणी कसुंब्यातून दोघे गजाआड

सुप्रिम कॉलनीत किरकोळ मंगळवारी (ता.३०) वादातून कैलास पवार यांच्या घरात घुसून चार हल्लेखोरांनी कैलास व त्यांची मुलगी तेजस्विनी यांच्यावर चॉपरने वार करून गंभीर केले होते.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : सुप्रिम कॉलनीतील रहिवासी कैलास ऊखा पवार यांच्यासह त्यांच्या दहा वर्षाच्या मुलीवर घरात शिरून सशस्त्र हल्ला केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी गौरव कांतिलाल नाईक (वय २४) व नकुल मनोज बागूल (वय १८ दोघे रा.सुप्रिम कॉलनी यांना बुधवारी (ता.३१) दुपारी कुसुंबा येथून अटक केली. (father and daughter attack case 2 accused arrested by police jalgaon crime news)

सुप्रिम कॉलनीत किरकोळ मंगळवारी (ता.३०) वादातून कैलास पवार यांच्या घरात घुसून चार हल्लेखोरांनी कैलास व त्यांची मुलगी तेजस्विनी यांच्यावर चॉपरने वार करून गंभीर केले होते. जखमींच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, घटनेनंतर फरार असलेले हल्लेखोर गौरव नाईक व नकुल बागूल यांना आज पोलिसांनी कुसुंबा येथे जाऊन उचलले.

एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, विजय पाटील, किशोर पाटील, सचिन पाटील, छगन तायडे, किरण तायडे, राहुल रगडे या पथकाने कुसुंबा गावातून दोघांना ताब्यात घेतले. आणखी दोन संशयित असल्याचे पोलिस इतर साथीदारांचा शोध घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply : मुंबईकरहो पाणी जपून वापरा, तब्बल तीन दिवस होणार पाणी कपात; नेमकं कारण काय?

Madras High Court to Vijay Thalapathy : करूर चेंगराचेंगरी प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने विजय थलपतींना फटाकरलं!

Cough Syrup Ban : कफ सिरप प्यायल्याने मध्यप्रदेश अन् राजस्थानमध्ये ११ बालकांचा मृत्यू; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Dr. Baba Adhav : शब्दांचे खेळ न करता सरकारने संकटग्रस्तांबरोबर उभे राहावे

Latest Marathi News Live Update: राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती

SCROLL FOR NEXT