law-for-abortion-atrocities esakal
जळगाव

Jalgaon Crime News : रिक्षातून ओढून महिलेवर चाकू हल्ला प्रकरणी चुलत सासऱ्यास सश्रम कारवास!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या विवाहिता रुग्णालयात दाखल मुलीचा जेवणाचा डबा घेऊन निघाली होती. चुलत सासऱ्याने बळजबरी रिक्षातून ओढून तिच्यावर धारदार चाकूने हल्ला चढविला. सात वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर संशयिताविरुद्ध दोषारोप सिद्ध होऊन न्यायालयाने त्यास सहा महिन्यांच्या सश्रम कारवासाची शिक्षा ठोठावली. (father in law life rigorous imprisonment in case of knife attack on woman after being dragged from rickshaw Jalgaon Latest Crime News)

हेही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेली महिला सुरेखा रवींद्र सोनवणे यांची मुलगी जिल्‍हा रुग्णालयात दाखल होती. मुलीचा जेवणाचा डबा घेऊन १४ ऑक्टोबर २०१५ ला रिक्षाने रुग्णालयात जात असताना, सुरेखा सोनवणे यांचा चुलत सासरा सीताराम अभिमन कोळी (वय ४६, रा. डांभुर्णी, ता. यावल) दारूच्या नशेत त्या रिक्षात बळजबरी शिरला. सुरेखा यांनी त्यास रिक्षातून उतरून जाण्यास सांगितल्यावर त्याने वाद घातला. रिक्षाचालकाने मध्यस्थीचा प्रयत्न केला असता, त्याच्या मानेवर चाकू ठेवून त्याला रिक्षा सोडून पळून जाण्यास भाग पाडले. त्यानंतर सीताराम कोळी याने सुरेखाबाई यांना रिक्षातून ओढत बाहेर काढून तिच्यावर धारदार चाकूने वार करून जखमी केले होते.

जखमी सुरेखाबाईने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात १५ ऑक्टोबर २०१५ ला गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. दाखल गुन्ह्यात पोलिसांनी संशयित सीताराम अभिमन कोळी याला अटक केली. काही दिवसांनी त्याला न्यायालयाने जामिनावर मुक्त केले. तपासाधिकाऱ्यांनी वेळेत तपास पूर्ण करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले. न्यायाधीश श्रीमती एस. एस. सापटनेकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू होती. सरकार पक्षातर्फे ॲड. प्रदीप महाजन यांनी सात महत्त्वपूर्ण साक्षीदारांच्या साक्ष नोंदवून घेतल्या.

दाखल गुन्ह्यात वैद्यकीय तज्ज्ञांचा अहवाल, पीडित महिलेचा जबाब, तपासाधिकाऱ्यांची साक्ष नोंदवून घेतल्या. नंतर दोन्ही पक्षाचा प्रदीर्घ युक्तिवाद होऊन प्राप्त दस्तऐवज, साक्षीदारांच्या साक्ष आणि ठोस पुराव्यान्वये संशयित सीताराम अभिमन कोळी याच्याविरुद्ध दाखल दोषारोप सिद्ध झाल्याने न्यायाधीश एस. एस. सपाटनेकर यांनी संशयितास सहा महिने सश्रम कारवास, ५ हजार दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पैरवी अधिकारी म्हणून ताराचंद जावळे यांचे खटल्यात सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goa-Solapur flight: वादळी वाऱ्याचा धोका; गोवा-सोलापूर विमान रद्द, प्रवाशांना पुढील तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार

मोंथा चक्रीवादळाने अरबी समुद्र खवळला, उरणमध्ये ३ बोटी भरकटल्या; 50 मच्छिमारांशी संपर्क तुटला

Latest Marathi News Live Update : नाशिक-चांदवड पुलाचा भराव गेला वाहून, ग्रामस्थांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास

PAK vs SA : फुसका बार..! Babar Azam दोन चेंडूंत झाला गार; पुनरागमनाची फक्त हवा, पाकिस्तानी चाहत्यांना आलं रडू Video

Yami Gautam and Emraan Hashmi: यामी गौतम आणि इमरान हाश्मी पहिल्यांदाच एकत्र, ‘हक’मधून समाजाविरुद्ध लढणाऱ्या आईची कथा

SCROLL FOR NEXT