A student showing a letter written by a student of Adarsh ​​Madhyamik Vidyalaya esakal
जळगाव

Jalgaon News : ‘बाबा मला शिक्षण घेऊ द्या...’ मुलींनी लिहिले पत्र; पालकांना भावनिक आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून मुलीचे वडिलांना पत्र या विषयाला अनुसरून येथील नाईक एज्युकेशन सोसायटी संचलित, आदर्श माध्यमिक विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थिनींनी आपल्या पालकांस व वडिलांना पत्र लिहिले.

या पत्रात बाबा मला शिक्षण घेऊ द्या, मोठे होऊ द्या, अधिकारी होऊ द्या, आपली स्वप्न पूर्ण करू द्या, अशा प्रकारचे भावनात्मक आव्हान मुलींनी केले आहे. (female students wrote letters to their parents and fathers in school jalgaon news)

मुख्य कार्यकारी अधिकारी (भाप्रसे) श्री. अंकित यांच्या संकल्पनेतून इयत्ता चौथी ते दहावीच्या मुलींसाठी हा उपक्रम राबविला आहे. यात इयत्ता चौथी ते दहावीपर्यंतच्या सर्व मुली एक पोस्टकार्ड घेऊन त्यावर आपल्या पालकांना पत्र लिहितील.

ज्यामध्ये त्यांना त्यांचे शिक्षण चालू ठेवून आयुष्यात काय बनायचे आहे, जेणेकरून त्यांनी शाळा सोडावी लागू नये, त्यांना भविष्यात कोणते करिअर करायचे आहे ते लिहू शकतात. त्यांना भविष्यात काय बनायचे आहे किंवा त्यांची काही इच्छा आहे, ते पत्राने पालकांना मुली कळवतील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

१५ ऑगस्ट २०४७ ला भारतीय स्वातंत्र्याचा अमृत काळ पूर्ण होईल, त्या दृष्टीने देशाच्या विकासात माझे काय योगदान राहील, याबाबत ही पत्रात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करणे आवश्यक आहे, अशा सूचना मुलींना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार उत्स्फूर्तपणे सर्वच विद्यार्थिनींनी पत्र लिहिलेत अनेक भावनिक आव्हान आपल्या पालकांना केले आहे.

अनेक विद्यार्थ्यांचे हे पत्र वाचताना डोळे पानावले होते. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष सी. के. पाटील, सचिव सुरेखा पाटील, संचालक मच्छिंद्र पाटील, अश्विन पाटील, मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे यांनी कौतुक केले आहे.

या उपक्रमासाठी परिश्रम घेणाऱ्या आदर्श विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका यांचे देखील संस्थेने कौतुक केले. या पत्रव्यवहारामुळे मुलींना पत्र लिहिण्याची सवय तर झालीच. मात्र पालकांना आपल्या मुलीने पाठवलेले पत्र वाचून अनेकांना गहिवरून आले होते, असे विद्यार्थिनींनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

Mumbai News: मुंबईतील तरुण समुद्रात अडकला... एका घड्याळामुळे कसा वाचला जीव? थरारक प्रसंग वाचा...

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय; शेअर्स तारण ठेवून 1 कोटी रुपयांचे कर्ज घेता येणार

Deepak Borhade: दीपक बोऱ्हाडेंचे उपोषण तूर्त स्थगित; धनगर आरक्षणाचा लढा, शासनासोबत चर्चा सुरू ठेवण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT