Fighting esakal
जळगाव

आईच्या शेतावरून पेटली भावंडात ‘भाऊबंदकी’; नातवाने गमावले प्राण

कौटुंबिक बैठकीत सर्वकाही ठरलेले असताना पुन्हा भाऊबंदकीचा वाद उफाळुन आला.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शेतीच्या वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात तरुणाचा उपचारादरम्यान गुरुवारी (ता. १२) मृत्यू झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयात नातेवाइकांनी एकच गर्दी केली होती.

एरंडोलच्या मारोती मढी येथे आबा भगवान महाजन पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास असून त्यांना, सुरेश, तुकाराम आणि मगन असे तीन भाऊ आहेत. त्यांच्या आईच्या हिस्स्याचे शेत जो मुलगा करेल त्याने त्यांना वर्षांला १५ हजार रुपये द्यायचे, असे कौटुंबिक बैठकीत ठरविले होते.

याच शेताच्या वादातून आबा महाजन यांचे सुरेश, तुकाराम आणि मगन या तिघा भावांशी गुरुवारी (ता. १२) वाद उफाळून आला. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आबा महाजन यांना भाऊबंदकीत मारहाण होत असल्याचे ऐकून त्यांचा मोठा मुलगा उमेश तिथे आला. याचा राग आल्याने सुरेश, तुकाराम, मगन व तुकारामचा मुलगा मनोज आणि पत्नी उषाबाई यांनी आबा महाजन आणि उमेश महाजन यांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. उमेशच्या गुप्तांगावर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमीला जळगावला हलविण्याचा सल्ला दिला. दुपारी एकला बेशुद्धावस्थेत उमेशला घेऊन कुटुंब जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. जिल्‍हा रुग्णालयात उपचार सुरू असताना, सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. उमेशचा मृत्यू झाल्याचे कळताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

संशयितांच्या अटकेसाठी संताप

उमेश महाजन याचा मृत्यू झाल्याने नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. विच्छेदनासाठी मृतदेह रवाना केल्यानंतर मृताचा भाऊ नीलेश याने शवविच्छेदनाला नकार देत अगोदर संशयितांना अटक करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्रा घेतल्याने रात्री उशिरापर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ शकले नाही. रात्री दहापर्यंत एरंडोल पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. उमेशच्या मागे आई सुनीता, वडील आबा महाजन, भाऊ नीलेश, पत्नी मयुरी, बहीण रूपाली असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT